Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भारत विजयी विराटची वादळी खेळी चौकार मारुन शतक केलं साजरं

विराटची विराट खेळीने भारत विजयी 



दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवत दणदणीत विजयश्री खेचून आणला विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने दिलेले 242 धावांचे आव्हान भारतीय संघाने सहज पूर्ण केले. या लाजिरवाण्या पराभवासोबतच पाकिस्तान संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे पाकिस्तानच्या 242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिलने जोरदार फटकेबाजी केली. खणखणीत चौकार, षटकारांची आतषबाजी सुरु असतानाच रोहित शर्मा आऊट झाला. त्यापाठोपाठ शुभमन गिलचाही त्रिफळा उडाला. त्यानंतर मैदानात उतरेल्या विराट कोहलीने व श्रेयस अय्यरने साथ दिली, मात्र एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो 56 वर आऊट झाला. 

विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. विराटने शेवटपर्यंत फटकेबाजी करत जबरदस्त शतक झळकावले. तोच या सामन्याचा हिरो ठरला. विजयासाठी दोन धावांची गरज असताना कोहलीने खणखणीत चौकार ठोकत संघाचा विजय आणि त्याचे शतकही पूर्ण केले. टीम इंडियाने 42.3 ओव्हरमध्ये 244 धावा केल्या.पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हकने सामन्याला सावध सुरुवात केली. मात्र नवव्या षटकात सलग दोन धक्के देत भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडली. त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळती सुरु झाली.
आता भारतीय संघाचे सेमी फायनल मध्ये जाण्याचा रस्ता मोकळा झाला आहे A गृप मधे आता भारतीय संघ उच्च स्थानावर आहे

 

Tags

Post a Comment

0 Comments