सहसंपादक=अनिल बोराडे
पिंपळनेर (प्रतिनिधी)जल, जंगल,जमीन,नदी,नाले, डोंगर,दऱ्या ,खोऱ्या, पहाड पर्वतांचे महत्त्व जाणून वृक्ष लागवड करून त्याचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे,नदी,नाले,समुद्र स्वतःच्या स्वार्थाकरिता बुजवून,डोंगरदऱ्या सपाट करून,शहराचे काँक्रीट इमारतीचे जंगल उभारून, आपला विकास झाल्याचे स्मार्ट सिटी उभी राहिल्याचे वास्तव जगाला दाखवून आपण खूप विकसित आहोत हे दाखविणे म्हणजे स्वतःला फसविणे होय. पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे मानवाचा अंत असे होऊ नये यासाठी पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन न केल्यास भविष्यात त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागणार आहे असे मौल्यवान प्रतिपादन से.नि. प्राचार्य एस.डी.पाटील यांनी संत ठाकूरसिंग ज्ञानपीठ विद्यालयात पर्यावरण प्रबोधन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश बागुल यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गिरीश वाघ यांनी केले. प्राचार्य एस डी पाटील पुढे म्हणाले निसर्गाचं, डोंगराचे खच्चीकरण करण्यात येत असल्याने पावसाळ्यात पाण्याने रौद्ररूप धारण केल्यास यातून होणारी जीवित हानी टाळणे हे मानवाच्या हाती राहिले नसल्याने, मानवाच्या विध्वंसास मानवच कारणीभूत "जशी करणी तशी भरणी" हे निसर्गाचे तत्व लागू पडल्यास नवल वाटण्यासारखं काही नाही. पर्यावरण नुसतं जंगलावर अवलंबून नसून मोठ्या प्रमाणावर होणारे उद्योग क्षेत्राचा आक्रमण, पर्यावरणास
मारक ठरत असून आग व धूर ओकणाऱ्या चिमण्यांमुळे, वाहनांच्या वाहतुकीमुळे, पाणी व जमीन दूषित झाल्यामुळे पर्यावरणातील तापमानात वाढ होऊन याचा परिणाम सजीव सृष्टीवर होत असल्याने जागतिक तापमानात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा मानव प्राणी हा स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गाला ओरबाडतो आहे, निसर्गावर मात न करता निसर्ग नियमांचे पालन करून त्यानुसार वागणं हे मानव जातीचे कल्याण करणारे आहे. मानव जातीला भविष्यात होणाऱ्या विध्वंसाची जाणीव निसर्गाने वेळोवेळी करून दिली आहे. म्हणून पर्यावरण प्रति मानवाने सतस जागरूक राहून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करून निसर्गाचे संवर्धन संवर्धन केल्यास मानवी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, पर्यावरण प्रबोधन करताना प्राचार्य पाटील यांनी "लावा फळ हो आंबा कुणी, गोड फळ देती अमृताहुनी" कडुलिंब हा वृक्ष नाही वटवृक्ष "आम्ही वनात राहणारे वनवासी बंधू रे आदिवासी बंधूरे झाडे झुडे,पशु पक्षी आमचे सगे सोयरे अशी पर्यावरण गीते, सुभाषिते व चारोळ्या सादरीकरण करून विद्यार्थ्यांना प्राचार्य पाटील यांनी खिळवून ठेवले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.त्यात श्रीमती सुरेखा कुवर,सुनंदा पगारे,रेखा पाटील,गिरीश वाघ,सचिन पवार,अश्विनी बागुल,ज्योती बर्डे, दीपिका नेरे,सीमा साळुंखे,प्रियंका नांद्रे,आदि शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.शेवटी आभार राहुल जगताप यांनी मानले.
Post a Comment
0 Comments