Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

न्यु ईंग्लीश स्कूल पिंपळनेर चे १९७६ चे एस.एस.सी. वर्गाचे मित्र, मैत्रीण ५० वर्षात पुन्हा आले एकत्र!!

 अनिल बोराडे 



पिंपळनेर  येथील पन्नास वर्षांपूर्वी १९७६ ची न्यु ईंग्लिश स्कूल च्या दहावीच्या वर्गातील वर्गमित्र मैत्रिणींचा दोन दिवस स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सत्तरीच्या दशकात पाचवीच्या वर्गासाठी प्रवेश घेऊन शालेय शिक्षणाची सुरुवात करून उज्वल भविष्याचे स्वप्न मनाशी बाळगून पिंपळनेर सह  परीसरातील तसेच आपल्या गावी शिक्षणाची सुविधा नसल्याने नातेवाईकांच्या घरी राहून शिक्षण घेणारे वर्ग मित्र स्नेह मेळाव्या निमित्त एकत्र जमले या स्नेहमेळावाच्या अध्यक्षस्थानी शांताई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दिलीप बधान होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उद्योजक शामकांत कोठावदे, फार्मसी उद्योजक नरेंद्र कोतकर,से.नि.प्राचार्य डॉ.श्रीराम पाटील, पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप, डॉ.प्राचार्य दिपक शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.पहिल्या दिवशी तिर्थक्षेत्र गांगेश्वर येथे स्नेह मेळावा झाला या तिर्थक्षेत्राचा कायापालट उद्योजक शामकांत बाबुलाल कोठवदे यांनी लाखो रुपये खर्च करून भव्यदिव्य सभागृह बांधुन व ब्लाॅक बसवून केला हे पाहून माजी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून आपल्या कुटुंबाचा परीचय देऊन, सध्या कुठे वास्तव्यास आहेत, हे ही सांगितले,नंतर सर्वांनी गांगेश्वर दर्शन घेतले व सुरू ची  दाल ,बट्टी ,भोजनाचा आनंद घेतला.नंतर दुपारी चार वाजता जुनी न्यु ईंग्लिश स्कूल,आत्ताची कर्म.आ.मा.पाटील विद्यालयास भेट दिली.येथिल अवघडनाथ महाराजांच्या व कर्म.बंडु बाबूजींच्या समाधीचे दर्शन घेतले या ठिकाणी 

  संस्थेच्या वतीने संचालक व सहकारी शिक्षक यांनी . माजी विद्यार्थ्यांचे विद्यालयात स्वागत केले.माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला भेट दिल्यावर शाळेत झालेला बदल, कौलारू शाळेच्या जागेवर भव्यदिव्य तिन मजली व डिजिटल रूम बघुन आनंद व्यक्त केला.शाळेच्या प्रत्येक रुमला माजी संस्थापक संचालकांचे,व मुख्याध्यापक,व कर्मचाऱ्यांचे फोटो सह दिलेले नाव बघुन १९७६ काळ डोळ्यासमोर फ्लॅश बॅक झाला.त्यानंतर सायंकाळी 

 वर्गमित्र व शांताई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  दिलीप शिवराम बधान यांच्या सेयान इंटर नॅशनल पब्लिक स्कूल च्या  प्रांगणात  संस्थेचे कार्याध्यक्ष रूपेश बधान व त्यांच्या कर्मचारी वर्गाने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.रात्री १० वाजेपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी विध्यार्थी दिशेतील किस्से सांगितले, कविता व  गाण्यांची महीफील झाली. रात्री स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. वर्ग मित्राची भरभराटीला आलेली संस्था बघुन सर्व मित्रांनी आनंद व्यक्त केला.

       दुसर्या दिवशी सर्व मित्र, मैत्रीण 

      गुजरात राज्यातील तिर्थक्षेत्र शबरीधाम येथे पोहचले,  निसर्ग रम्य व घनदाट जंगलात डोंगराच्या ऊंच शिखरावर असलेल्या शबरी मातेच्या मंदिरात दर्शन घेतले निसर्गाचा आनंद घेतला.नंतर जवळच असलेल्या पंपासरोवरावर जाऊन येथील मंदिरात दर्शन घेतले,नंतर भोजन घेऊन या ठिकाणी ही आपल्या आठवणींना उजाळा देत खोडकर किस्से सांगितले.

  वयाची सासष्टी, पार केलेल्या ज्येष्ठ विद्यार्थी बालपणात रममाण झाले. तर अनेकांच्या नक्कला करून हास्यकल्लोळात मित्रां समवेत दिवस घालवला. शेवटी ५० वर्षानंतर एकत्र आलेल्या 

  विध्यार्थी  बघीणींना  माहेरची साडी म्हणून येवल्याची पैठणी,तसेच सोबत आलेल्या वहिणींना ही पैठणी ,सन्मान चिन्ह व बांधवांना व सोबत आलेले पंतांना सुंदर टी शर्ट.व स्मृती चिन्ह,व सेयान इंटर नॅशनल स्कूल चे आकर्षक कॅलेंडर भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठीआयोजक,प्रायोजक वर्गमित्र शामकांत कोठावदे.,दिलीप बधान, नरेंद्र कोतकर,सुभाष जगताप, प्रा श्रीराम पाटील,प्रा.दिपक शिंदे,से.नि.ए.पी.आय.दिलीप जगताप, गव्ह.काॅं.सुनिल सोनवणे,ईंजि.दिलीप एखंडे,आर.टी.ओ.राजेंद्र शिंपी,दिलीप क्षिरसागर,प्रा. विलास घरटे, प्रकाश   नेरकर,भानुदास भदाणे,दिलीप चौधरी, डॉ माणिक निकम,ईंजि.नानासाहेब बर्डे, भगवान दशपुते, चंद्रकांत कोठावदे,सौ.मंगला खैरणार

यांनी परीश्रम घेतले.अनेकांनी सहकार्य करत दोन दिवस एकत्र राहीलेले मित्र, मैत्रीण सायंकाळी आपल्या घराकडे मार्गस्थ झाले.

Post a Comment

0 Comments