Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पालक संघर्ष समितीच्या वतीने शिक्षणमंत्र्यांना घेराव करून दिले निवेदन




नाशिक – मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श शिशु विहार उत्तम नगर सिडको या दोनही शाळांमध्ये दरवर्षी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरु आहे. या संधर्भात पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणमंत्र्यांपासून ते शिक्षणविभागातील मंत्रालयापासून ते जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांना शेकडो निवेदने दिली आहेत, कार्यालयांमध्ये धरणे आंदोलने केली आहेत. परतू शिक्षण विभागातील कुणी हि अधिकारी पालकांना न्याय मिळवून देत नाही म्हणून पालक संघर्ष समितीच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे एका कार्यक्रमात आले असता पालकांनी त्यांना घेराव घातला व शिक्षण विभागातील अधिकारी हे पालकांना का न्याय देत नाहीत, शिक्षण विभागातील अधिकारी हे शाळा व संस्थेतील भ्रष्टाचार दडपण्याचा का प्रयत्न करीत आहेत या विषयी शिक्षण मंत्र्यांना पालकांच्या वतीने निवेदन देऊन विचारणा करण्यात आली.


            सिडको परिसर हा कामगार, कष्टकरी मोलमजुरी करून आपला उदर निर्वाह करणारा वर्ग आहे या परिसरात मराठा विद्या प्रसारक संस्थेची अभिनव बाल विकास मंदिर हि शाळा १००% सरकारी अनुदान प्राप्त करणारी शाळा आहे, अनुदानित शाळेत मुलांना मोफत शिक्षण सक्तीचे आहे. परतू तरीही शाळा व संस्था प्रशासन दर वर्षी पालकांकडून फी च्या नावाने ७५०० रुपये वसूल करीत आहे. शाळेच्या आवारात शैक्षणिक साहित्य विक्री करण्यावर बंधन असतांना हि शाळा व संस्थेच्या वतीने पालकांना बळजबरीने नवनीत प्रकाशनाची पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जाते, पुस्तकाची एकूण छापील किंमत ६५० रुपये असून शाळा व संस्था पालकांकडून २२०० रुपये वसूल करीत आहे, एक एका वर्गात ८० ते ९० मुले कोंबून भरली जातात मुलांना बसायला वर्गात जागा नाही, खेळायला मैदान नाही (६ महिने आहे ते मैदान चिखलात असते) वर्ग खोल्या पुरेश्या नाहीत तरीही दर वर्षी पालकांकडून इमारत निधीच्या नावे प्रत्येक पालकांकडून ७०० ते ९०० रुपये वसूल केले जात आहेत. वर्षभरात इमारत निधीच्या नावाने करोडो रुपयाचा फंड जमा होत आहे परतू शाळेने गेल्या १० वर्षात एक रुपयाहि खर्च केलेला नाही, जमा झालेल्या पैश्यांचा हिशोब पालकांना दिला गेलेला नाही, मुलांच्या विमा पोलीसिच्या नावाने दर वर्षी प्रत्येक मुलाकडून २०० रुपये वसूल केले जातात परतू शाळेने गेल्या ४-५ वर्षापासून मुलांची विमा पोलीसीच काढलेली नाही, मग विमा पोलीसीचे दर वर्षी जमा होणारे लाखो रुपये गेले कुठे याचा हिशोब पालकांना मिळालेला नाही. अचानक शाळेचा गणवेश मध्ये बदल करून पालकांना नवीन गणवेश, पिटी चा गणवेश घेण्यास भाग पाडणे, गणवेश चढ्या दराने संस्थेने व शाळेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. संस्थेची आदर्श शिशु विहार या शाळेत प्रवेश घेताना २० ते २५ हजार रुपये डोनेशन घेतल्याशिवाय एक हि प्रवेश मिळत नाही. हि आदर्श शिशु विहार हि शाळा विना अनुदानित असून या शाळेत शिक्षक पालक संघाची कार्यकारी समितीची नेमणूक न करतात बेकायदेशीरपणे मागील वर्षापासून शाळेची फी १५०० रुपयांनी व बसची फी १००० रुपयांनी वाढ केली आहे. आज पर्यत शिक्षक पालक संघाची मिटिंग न घेताच प्रत्येक पालकाकडून ५० रुपये वसूल केले जातात.


            या संधर्भात शेकडो पालकांनी एकत्र येऊन गेल्या दोन वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, महिला व बाल विकास मंत्री, मुख्यसचिव सो. शालेय शिक्षण कार्यालय, अध्यक्ष सो, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, मुंबई. मुख्य सचिव सो, मंत्रालय, मुंबई. शिक्षण सचिव सो. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, विभागीय अध्यक्ष / सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिक्षण आयुक्त, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी कार्यालय नाशिक महानगर पालिका, अध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक समाज, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, मुख्याध्यपिका सो, आदर्श शिशु विहार, मुख्याध्यपिका सो, अभिनव बाल विकास मंदिर,  यांना पालकांनी आतापर्यत अनेक वेळेस पत्रव्यवहार केला आहे, शाळेत सुरु असलेल्या भ्रस्ताचारचे सर्व पुरवावे शिक्षण विभागाला दिले आहेत, अनेक वेळेस पालकांनी धरणे आंदोलने केली आहेत. परतू आज पर्यत शिक्षण विभागातील अधिकार्यांनी या तक्रारींची दखल घेतलेली नाही. एक प्रकारे शिक्षण विभाग व शिक्षण विभागातील अधिकारी हे मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शाळांमध्ये सुरु असलेला भ्रष्टाचार दडपण्यासाठी काम करीत आहेत व पालकांवर अन्याय करत आहेत. पालकांना न्याय दिला जात नाही.   


              शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पालकांच्या सर्व समस्या निवेदनातून समजून घेतल्या व लवकरच शिक्षण विभागातील अधिकार्यांना सांगून हा पालकांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी निवेदन देतांना पालक संघर्ष समितीचे महेश मोतीलाल पाटील, पुष्पेंद्र महाजन, राजेंद्र शिंदे, संदीप गांगुर्डे, कांतीलाल गांगुर्डे, भगवान पाटील, नामदेव फिरके, पोपट जाधव, चेतन बच्छाव, पंकज देवरे, हितेश महाजन, विशाल देशमाने, योगेश पाटील यासह शेकडो पालक उपस्थित होते 

 मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शाळांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून पालकांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देतांना पालक संघर्ष समितीचे प्रतिनधी,

Post a Comment

0 Comments