सहसंपादक=अनिल बोराडे
पिंपळनेर प्रतिनिधी=छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिव महानाट्य सादरीकरण पिंपळनेर येथील कै. साहेबराव पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले यावेळी जय भवानी जय शिवाजीचा गजराने अवघी पिंपळनेर नगरीत दुमदुमली होती या महानाट्याला महिलांनी व पुरुषांनी मोठी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी मित्र मंडळ शिवजन्मोत्सव समिती पिंपळनेर व ग्रामस्थ यांच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिव महानाट्य संपन्न झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, जिल्हा परिषद सदस्य सुधामती गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, बाळासाहेब शिंदे, सुरेंद्रराव मराठे, सुवर्णा आ
अजगे, त्र्यंबकराव सोनवणे, विजय गांगुर्डे, शामकांत शिरसाठ, ए. बी.मराठे, उत्तम माळी, सतीश पाटील, योगेश नेरकर, सुभाष गांगुर्डे, पांडुरंग सुरवंशी, विनोद कोठावदे, संदीप गांगुर्डे, विजय दहीते, नरेंद्र गांगुर्डे, पंकज पाटील, निलेश वाणी, निलेश कोठावदे, देवेंद्र कोठावदे, दिनेश पाटील, बबलू चौधरी, पी एल गोयकर आदीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव समिती आयोजित शिव महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते सदर महानाट्य८५ कलाकारांनी सहभाग घेत पिंपळनेकरांना शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव ते जीवनकार्य विचार तसेच गनिमीकावा शूरवीरता बुद्धीचातुर्य चा अभ्यास या नाटकातून पाहावयास मिळाला तसेच शिवराज्याभिषेक सोहळा आदी सर्व दृश्य हे प्रेक्षकांना खरे वाटत होते. शिव महानाट्य नसून त्या काळातील इतिहास पाहत आहोत.असा भास होत होता साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास महाराजांचे कार्य श्रोत्यांनी पाहत कलाकारांना दाद दिली तसेच जय भवानी जय शिवाजी चा गजर वेळोवेळी होत होता. शिव महानाट्य हे सोमवारी सायंकाळी सुरू होऊन हे नाटक तीन तास चालले हे शिव महानाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी मित्र मंडळ शिवजन्मोत्सव समिती पिंपळनेर ग्रामस्थ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला.ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे
Post a Comment
0 Comments