सहसंपादक=अनिल बोराडे
(धुळे )महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा ‘बालस्नेही पुरस्कार २०२४' यंदा धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (भा.पो.से) यांना जाहीर झाला आहे. बालहक्क संरक्षण व बालस्नेही उपक्रमांसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा ३ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, गृहराज्यमंत्री
(शहरी) योगेश कदम तसेच महिला व बाल विकास
राज्यमंत्री मेघना बोडर्डीकर हे राहणार आहे. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री. धिवरे यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून
अभिनंदन होत आहे.
पोलिस बॉईज असोसिएशन धुळे जिल्हा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क तर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Post a Comment
0 Comments