सहसंपादक=अनिल बोराडे
पिंपळनेर येथील १ कोटी ६७ लाख रुपये खर्च करून सुशोभित बस स्टॉप चे आमदार सौ.मंजुळाताई गावीत यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना प्रमुख डॉ.तुळशिराम गावीत होते यावेळी व्यासपीठावर साक्री आगार व्यवस्थापक सुनील महाले, पिंपळनेर वाहतुक नियंत्रक पोपट बाळु ठाकरे, इम्रान अली सैय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड ज्ञानेश्वर एखंडे,ईंजि.सागर गावित, महिला आघाडीच्या सौ.कविता क्षिरसागर, व्यापारी आघाडी चे अध्यक्ष शाम शेठ कोठावदे,सिख पिंपळनेर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप बधान, डॉ .पंकज चोरडिया,माजी सभापती जितेंद्र बिरारीस,गव्ह.काॅन्ट्रॉक्टर कृष्णा वृंदावन, साक्री विधानसभा प्रमुख संभाजीराव अहिरराव , जगदीश ओझरकर,चंदु गवांदे,शिवसेनेचे बबलू चौधरी,सुदाम पगारे ,आरूण निकुम,पिंपळनेर शहर प्रमुख विष्णू पवार, विक्की वाघ,अमित सुर्यवंशी, बबलू शेख, पिंपळनेर तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप,प्रताप पाटील, शांताराम आहीरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
साक्री तालुक्याच्या आमदार सौ.मंजुळाताई गावीत यांनी वचन पुर्ती पिंपळनेर बसस्टॉपचे नुतनीकरण व सुशोभीकरण साठी १ कोटी ६७ लाख रुपये निधी मिळवून आणला.व त्यातून बसस्टापवर संपूर्ण काॅंक्रीटीकरण करून रंगरंगोटी,करून स्वच्छ व सुंदर करण्यात आले.या वेळी पिंपळनेर करांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले.प्रास्तावीक संभाजीराव अहिरराव यांनी केले तर आभार साक्री आगार प्रमुख सुनील महाले यांनी मानले
Post a Comment
0 Comments