पिंपळनेर
शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, लोकांनी ते वाचले पाहिजे नव्हे त्याप्रमाणे आचरणे केले पाहिजे ,यासाठी राजे छत्रपतीमा आ.ई.मि. पब्लिक स्कूल पिंपळनेरयेथे दरवर्षी मोठ्या दिमाखात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करतात.छ. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आजच्या बालकांसाठी,युवक युवतींसाठी,प्रचंड ऊर्जा स्रोत आहे .जगजेता हिटलरही म्हणत होता,नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्याही हिटलरची गरज नाही.ज्यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्या छ.शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्याची आणि आचरणात आणण्याची गरज आहे.छ.शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर,येणाऱ्या पिढीसाठी प्रचंड ऊर्जा स्रोत आहे असे मौल्यवान प्रतिपादन राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 जयंती निमित्त कवी लेखक प्रेमचंद अहिरराव यांनी व्यक्त केले.सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवआरती मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव अहिरराव होते.यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. भालचंद्र दुसाने, एड.मोहन साळुंखे,व्याख्याते प्रेमचंद अहिरराव,ग.भा.,सुभद्राताईअहिरराव,संत ठाकूरसिंग ज्ञानपीठचे सचिव संजय नेरकर,डॉ.दत्तात्रय दळवेलकर,डॉ.विवेकानंद शिंदे,डॉ.समाधान देसले,डॉ. यशोदिप पाटील,पिंपळनेर पो स्टे.चे स.पो.नि.किरण बर्गे व सौ बर्गे ,संस्थेचे संचालक रा.ना.पाटील, जगदीश ओझरकर, मुख्याध्यापिका सोनाली पाटील,महेद्र अहिरराव, मनोहर खरोटे,प्रदीप गांगुर्डे, विष्णू पवार ,सरपंच हरिभाऊ आंबेकर,शाम दुसाने,रिखबशेठ गोगड,सर्व पत्रकार व न्यूज चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सोनाली पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अमोल अहिरे यांनी केले.यावेळी सर्व मान्यवरांचा फेटे बाधून व भगवे वस्त्र व बुके देऊन सन्मानही करण्यात आला. वक्ते प्रेमचंद अहिरराव पुढे म्हणाले छ.शिवाजी महाराजासाठी स्त्री ही देव्हाऱ्यातील देवता होती,सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन परत पाठवणे,मा जिजाऊंना सती जाण्यापासून रोखणे, रांझाच्या पाटलांनी एका स्त्रीची अब्रू लुटली असताना त्याच्या हाता पायाचा चौरंग करणे, ही शिक्षा दिली,स्त्रीया प्रती मोठा आदर्श स्त्रीच्या प्रति छत्रपती शिवराया पाशी होता,पाच पादशाहया पालथ्या घातल्या.प्रत्येक लढाईचं,गनिमी काव्याचं सूक्ष्म नियोजन मा जिजाऊ करून देत होत्या, अफजलखान भेटीत सय्यद बंडाचा वार परतवला, विश्वासू मावळ्याच्या मन,मनगटावर विश्वास म्हणून गतीचे नीतीचे मानवतेचे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी केले,आणि कीर्ती मिळवली.जात धर्माचे बंधन नव्हते.अनेक गड किल्ले जिंकले पण एकाही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही.इतका निस्वार्थी ,निस्पृह राजा, झपाटलेले व्यक्तिमत्व म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होते ,हे शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, प्रबोधन झाले पाहिजे यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव अहिरराव आणि त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी प्रचंड मेहनत घेतात. तन-मन-धनाने झोकून देतात.आणि "जगात भारी आमच्या राजाची जन्मतारीख 19 फेब्रुवारी" मोठ्या जल्लोषात व दिमाखात साजरी करतात. असे प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त सादर केलेले देशभक्तीपर गीते अनेक थीम यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थित सर्वांचे मुख्याध्यापिका सोनाली पाटील यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments