Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेर येथे रामनगर नवयुवक मंडळातर्फे शिव जयंती जल्लोषात साजरी


सहसंपादक अनिल बोराडे 

 पिंपळनेर: येथील रामनगर नवयुवक मित्र मंडळातर्फे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

      यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन प्रमुख अतिथी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष श्री.सुरेंद्रराव मराठे, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे स.पो.नि.किरण बर्गे, मा.उपसरपंच विजय गांगुर्डे, योगेश नेरकर, मा.पं.स.सदस्य देवेंद्र पाटील, प्रा.के.झेड.देवरे, प्रा.डॉ.प्रतिभा चौरे, प्रकाश विसपुते, निलेश कोठावदे, दिनेश जैन, डॉ.कल्पेश टाटीया, सहनिबंधक इंजी.चंदन चौरे, सागर येवले,डॉ.देवरे, श्री.कोतकर, प्रशांत दशपुते आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बी.एस.कोठावदे सर यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन चरीत्रावर प्रकाशझोत टाकला. यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करण्यात आला.
          यावेळी रामनगर नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश खैरनार, दिपेश पाटील, चंद्रकांत चौरे, हेमंत सोनवणे, अभिषेक आढे, हरीष जगताप तसेच मंडळाचे सर्व सदस्य व परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेवटी योगेश आढे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments