सहसंपादक=अनिल बोराडे
पिंपळनेर नगर परिषदेत प्रथम वर्धापनदिनानिमित्त स्वच्छ शहर, सुंदर शहर अभियानांतर्गत आ.मंजुळाताई गावित यांनी पिंपळनेर नगर परिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सहा घंटा गाड्यांचे लोकार्पण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. तुळशीराम गावित शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी भुषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी वर्षभरात केलेल्या व करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार असल्याचे सांगितले व त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे लवकरच स्वच्छ शहर, सुंदर शहर म्हणून पिंपळनेर शहर नावारूपास येईल असे प्रास्ताविक केले.
यावेळी व्यासपीठावर आ. मंजुळाताई गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ, पिपळनेर पो.स्टे. चे स.पो.नि. किरण बर्गे, मुख्याधिकारी दीपक पाटील, मा.जि प सदस्य अॅड. ज्ञानेश्वर एखंडे, गोकुळ परदेशी, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष संगीता पगारे, शि.ता.प्र. अमोल सोनवणे, सामा कार्यकर्ते श्याम शेठ कोठावदे, रिखबशेठ जैन, वसंतराव
गांगुर्डे, व नगर अभियंता तेजस लाडे, शकील शेख आदि मान्यवर ऊपस्थित होते. नगरपरिषदेतर्फे मान्यवरांचा बुके देऊन सन्मान करण्यात आला. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संभाजी अहिरराव म्हणाले पिंपळनेर नगर परिषदेच्या विकासासाठी आ.मंजुळाताई गावित व डॉ. तुळशीराम गावित विशेष लक्ष देत असल्यामुळे ८५ कोटीचा निधी अवघ्या वर्षभरात उपलब्ध झाला. नगर परिषदेच्या प्रत्येक विकास कामांसाठी या उभयतांनी वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे पांझरा नदी स्वच्छता मोहीम, घनकचरा व्यवस्थापन स्टेट लाईट अग्निशमन बंब, ६ घंटागाडी व अजून लहान गल्लीबोळांसाठी छोट्या घंटागाडीची व्यवस्था केली जाईल, आपण त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले. यावेळी स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांना स्वच्छता कीट भेट म्हणून दिले. यावेळी डॉ.तुळशीराम गावित यांचे देखील भाषण झाले. आपण दर शुक्रवारी नगर परिषदेत स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही व जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आकाश ढोले यांनी केले. शेवटी आभार नगर अभियंता तेजस लाडे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments