सहसंपादक=अनिल बोराडे
(पिंपळनेर) दि. २४/०२/२०२५ मानवी शरीराला बाहेरच्या जगाशी संबंध जोडण्यासाठी नाक,कान,डोळा,जीभ,व त्वचा हे पाच ज्ञानेद्रिय महत्वाचे असतात. यापैकी ८० टक्के ज्ञान डोळ्यांमार्फत मिळत असते. ज्यांना डोळे नाहीत त्यांच्या अडचणी सर्वांना माहीत आहेत. म्हणून आपण जे समाजात अंध व्यक्ती आहेत त्यांना दृष्टी प्राप्त व्हावी यासाठी नेत्रदानाचे फॉर्म भरून नेत्रदीपक म्हणून काम करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. लहू पवार यांनी केले.
पिंपळनेर येथील कर्म.आ.मा.पाटील कला,वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान महाविद्यालयात
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सूचनेनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त "मरणोत्तर नेत्रदान जनजागृती" अभियानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. एल. बी. पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एल. जे. गवळी, सहा.कार्यक्रम अधिकारी डॉ.एन. बी. सोनवणे, डॉ. एस. एन. तोरवणे,डॉ. आनंद खरात, प्रा. उगलमूगले आदी उपस्थित होते.
प्राचार्य पवार पुढे म्हणाले की नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान आहे, जे मरणोत्तर करता येते. त्यासाठी वेगवेगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, रुग्णालयात स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. म्हणून आपण याचा प्रचार आणि प्रसार करावा व नेत्रदान करणाऱ्या व्यक्तींचे फॉर्म भरून घेण्यासाठी महाविद्यालयीन तरुण तरुणींनी सहभाग घ्यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एल.जे.गवळी, सूत्रसंचालन डॉ. आनंद खरात,आभार प्रा.सी.एन.घरटे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी प्रा. एम. व्ही.बळसाने, प्रा.जाधव, प्रा सूर्यवंशी, प्रा. सुभाळकर, प्रा. बागुल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, रासेयो विभागातील सर्व स्वयंसेवक,शिक्षकेत्तर बंधू-भगिनी यांनी सक्रिय सहभाग घेतला.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
* पिंपळनेर येथील वरिष्ठ महाविद्यालयात नेत्रदान विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रो.लहू पवार, सोबत प्रा.लोटन गवळी, डॉ. आनंद खरात, प्रा.विलास उगलमूगले, डॉ.नितीन सोनवणे आदी.
Post a Comment
0 Comments