सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर येथे विजया एकादशी माघ कृ .11 पूर्वाषाढा सोमवार दिनांक 24 /2 /2025 रोजी कुबेरेश्वर महादेव मंदिरात ज्येष्ठ पत्रकार, समुपदेशक व सेवानिवृत्त प्राचार्य श्री.एस.डी.पाटील व सौ. पुष्पलता शांताराम पाटील यांच्या शुभहस्ते कुबरेश्वर महादेव मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी साईबाबा कॉलनी मित्र मंडळ व अनेक शिवभक्त बंधु, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गणेशाची आरती, शिवशंभुची आरती दुर्गादेवीची आरती करून महादेवाला अभिषेक करण्यात आला. व उपस्थित सर्वांना आरती देऊन प्रसादाचे वाटपही करण्यात आले. दर सोमवारी साईबाबा कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने हा सन्मान प्रत्येक प्रतिष्ठित नागरिकाला देण्याचा प्रयत्न साईबाबा कॉलनी मित्र मंडळ यांचे सर्व पदाधिकारी करीत असतात. आजचा हा सन्मान जेष्ठ पत्रकार ,समुपदेशक, से.नि.प्राचार्य एस डी पाटील व सौ.पुष्पलता शांताराम पाटील व चिरंजीव अमोल पाटील यांना आरतीचा मान देण्यात आला.यांच्या शुभहस्ते सायंकाळी ठीक 7. 00 वाजता श्री.शिवाय नमस्तु भ्यम; व हरहर महादेवाचा गजर करण्यात आला.साक्री तालुका व पंचक्रोशी व परिसरातील एकमेव कुबेरेश्वर महादेव मंदिर असून कुबेश्वर महादेव मंदिरात चा यावर्षी प्रथम वर्धापन दिन आहे.एक वर्ष पूर्ण झाले. दिं.26/2/20 25 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व भाविकभक्तांना फराळ व प्रसादाचे वाटप स.10.00वा.ते2.00 वा.या दरम्यान करण्यात येणार आहे. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.
Post a Comment
0 Comments