सहसंपादक अनिल बोराडे
धुळे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व धुळे जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी इ. जबाबदार पदांवर कार्यरत असलेले, व आपला कार्यभार प्रामाणिकपणे सांभाळणारे व प्रशासनावर उत्तम पकड असलेले सचिन भास्करराव शिंदे ह्यांना उत्कृष्ट बाल विकास प्रकल्प अधिकारी, ह्याआंतरराष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले.
मुंबईतील अर्ली चाइल्डहुड असोसिएशन (ईसीए) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी लहान वयातील मुलांच्या बालपणीच्या शिक्षणासाठी काम करते. सदर संस्था दरवर्षी बालकांसाठी अति उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकिय अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट असा गौरव करून सन्मानित करत असते.
या वर्षाचा पुरस्कार धुळे विभागात उत्कृष्ट काम करणारे सचिन शिंदे यांना २०२५ या वर्षाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मुंबई येथे भव्य कार्यक्रमात नुकताच प्रदान करण्यात आला. यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सचिन शिंदे ह्यांनी बालकांसाठी व महिलांसाठी 2017 पासून महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (कळवण व शिरपूर), गट विकास अधिकारी (शिरपुर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जि प धुळे), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (धुळे) अशा विविध पदांवर विविध शासकिय योजना कार्यक्षमपणे राबवत बालक व महिला ह्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचा सर्वंकष उल्लेखनीय प्रयत्न केल्या प्रित्यर्थ सदर पुरस्कार देण्यात आला.
सचिन शिंदे यांनी आपल्या पदांवर कार्यरत असतांना शासनाच्या विविध योजना समजापर्यंत तात्काळ पोहोचवणे व गरजूंसाठी त्याचा सर्वतोपरी जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल हे काम केल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,शिवसेनेचे राजू पाटील, धुळे येथील आहीरराव हॉस्पिटलचे संचालक डॉ. संभाजी अहिरराव, पिंपळनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू पवार आदींनी अभिनंदन केले आहे.
* फोटो - मुंबई येथील कार्यक्रमात अर्ली चाइल्डहुड असोसिएशन कडून उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार स्वीकारताना सचिन शिंदे.
Post a Comment
0 Comments