Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

-श्री तीर्थक्षेत्र गांगेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

 सहसंपादक अनिल बोराडे 




पिंपळनेर
    साक्री तालुक्यातील सामोडे गावात श्री श्रेत्र गांगेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने एक दिवसाची यात्रा भरली होती यावेळी महापुजेचे आयोजन करण्यात आले होते या महापूजेचे मानकरी सौ सुजाता व श्री निलेश शामकांत कोठावदे व सौ शुभांगी व राजेंद्र पंढरीनाथ राणे यांनी आज पहाटे साडेबारा वाजेला महापूजा केली.

      पांझरा नदी,जामखेली,व वटखळ नदीच्या त्रिवेणी संगमावर अतिशय प्राचीन असे श्री तीर्थक्षेत्र गांगेश्वर मंदिरातून या मंदिरात महादेवाची पिंड ही पाण्यात आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव ही पाण्यात असलेली महादेवाची पिंड आहे या ठिकाणी  धुळे नंदुरबार नाशिक जळगाव तसेच गुजरात राज्यातून हजारो भाविक आपला नवस फेडण्यासाठी येतात . यावर्षी या मंदिरा समोरील भव्य प्रांगणात गुरुकृपा मॉलचे मालक श्याम बाबूलाल  कोठावदे यांनी लाखो रुपये खर्च करून भव्य सभा मंडप तयार करून त्यात ब्लॉक बसून सुंदर व्यवस्था केली आहे त्यामुळे भाविकांचे होणारे हाल आता होत नाही. या मंदिरासमोर भव्य असे जिवंत पाण्याचे कुंड आहे या ठिकाणी भाविक स्नान करून मग गांगेश्वर मंदिरात पूजेसाठी जातात यावर्षी सौ सुजाता व निलेश शमकान कोठावदे आणि सौ शुभांगी व राजेंद्र पंढरीनाथ राणे या दोन कुटुंबांनी रात्री बारा वाजेला महापूजा केली. आज महाशिवरात्री निमित्त  पिंपळनेर येथील महेश पलाणी यांनी हजारो लोकांना केळी व साबुदाण्याचा फराळ दिला 

      दिनांक २६/२/२०२५ रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज दिघावेकर यांचे रात्री ९ ते ११ कीर्तन झाले. तर २७/२/२०२५ रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प. गुरुवर्य हिम्मत महाराज माळी चाळीसगावकर यांचे काल्याचे किर्तन झाले. या कीर्तनासाठी ह भ प दिनेश महाराज घरटे, ह भ प सुनील महाराज दिघावेकर व ह भ प अण्णाजी बुधाजी सैंदाणे सामोडेकर यांनी मृदंगाचार्य आणि विणेकरी म्हणून मोलाची साथ दिली.

   दिनांक 27 रोजी सकाळी 11 ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या मंदिरासाठी अनमोल सहकार्य म्हणून श्यामकांत बाबूलाल कोठावदे पिंपळनेर, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे स.पो.नी. किरण बर्गे व सर्व पोलीस कर्मचारी, गांगेश्वर कंट्रक्शन सामोडे, विलास नवसारे, जागृती मंडप डेकोरेटर संदीप निकुंभ,, गुलाब श्रावण शिंदे सामोडे, रामदास नारायण चौधरी पिंपळनेर, विनायक बुवाजी पाटील रोहन, चंद्रकांत श्रावण घरटे, यांचे अनमोल सहकार्य लाभले, आलेल्या सर्व भाविकांचे हभप राजेश उत्तम अहिरे, संजय रामदास अहिरे, भूषण संजय अहिरे, कु. शिवानी रामेश्वर अहिरे, कु. गुंजन रामेश्वर अहिरे , शशिकांत रमेश पाटील,यांनी आलेल्या सर्व भाविकांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments