सहसंपादक अनिल बोराडे
राजे छत्रपती ईंग्लिश मेडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक गड किल्ल्यांवर अभ्यास दौरा सहल दि.२ फेब्रुवारीला पिंपळनेर येथुन रात्री ११ वाजेला निघाली होती.प्रथम महड येथील वरद विनायक गणपती दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले . त्यानंतर पालीचा बल्लाळेश्वर गणपती दर्शन त्यानंतर ऊन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंडांत विद्यार्थ्यांनी अंघोळ केली. त्यानंतर अरबी समुद्रातील मुरुड जंजिरा किल्ल्यात समुद्रमार्गातून दर्शन या ठिकाणी संभाजीराव अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना समुद्रातील तटबंदी किल्ल्याची संपूर्ण माहिती दिली तसे या ठिकाणी असलेल्या तोफा १९ बुरुज दरवाजे अशी माहिती देत विद्यार्थ्यांना नंतर रायगड किल्ल्यावर दर्शनासाठी नेले या ठिकाणी छत्रपती शिवरायांची ही राजधानी असून या ठिकाणी शिवरायांनी केलेला राज्याभिषेक या ठिकाणी महादेवाचे मंदिर शिवरायांची समाधी या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास मुघल कालीन आणि ब्रिटिश कालीन संपूर्ण माहिती देत शिवरायांनी केलेला प्रतापाचे या ठिकाणी माहिती दिली. त्यानंतर प्रतापगड दर्शन असे विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांचा अभ्यास व शिवरायांनी केलेला प्रतापचा हा प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन दाखवला यावेळी सर्व विद्यार्थ्यांना रोप वे ने किल्ल्यावर नेले त्यानंतर 3500 पायऱ्या उतरून किल्ल्याचे संपूर्ण दर्शन घडवले त्यानंतर विद्यार्थ्यांना थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथे महाबळेश्वर महादेव मंदिर तसेच पाच नद्यांचे उगमस्थान असलेले पंचगंगा मंदिर, एलिफंटा पॉईंट तसेच बोटिंग ,घोडे रपेट या ठिकाणी असलेल्या स्ट्रॉबेरी शेती उत्पादनाची माहिती देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यानंतर वाई येथील अतिशय पुरातन दगडी महादेव मंदिर तसेच वाईच्या गणपतीचे दर्शन घडवून, जेष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी या ठिकाणी मराठी शब्दकोश संग्रहालयाला भेट दिली या ठिकाणी पिंपळनेर येथील जन्मगाव असलेले व वाई स्थित झालेले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या कार्याची माहिती दिली.
अशा प्रकारे पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मेडियम स्कूलचा पाच दिवसांचा इतिहासकालीन गडकिल्ल्यांचा अभ्यास दौरा सहल संपन्न झाली.
या सहलीचे आयोजन राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन संभाजीराव आहेरराव यांनी केले होते यात विद्यार्थ्यांना नाष्टा ,चहापाणी, जेवण अतिशय चांगल्या प्रकारे देण्यात आले सहल यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या प्राचार्य संगीता पाटील, अमोल आहिरे सर, मुस्ताक शेख सर ,बाळासाहेब गायकवाड सर , राणी सुर्यवंशी मॅडम , गायत्री गवळी मॅडम, ज्योती गांगुर्डे मॅडम,शितल वळवी मॅडम,शितल वाघ मॅडम,पत्रकार अनिल बोराडे,भिलाजी जिरे, चंद्रकांत घरटे,जेष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांचेही सहकार्य लाभले .
Post a Comment
0 Comments