सहसंपादक अनिल बोराडे
(पिंपळनेर प्रतिनिधी)धुळे जिल्हयातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजेच पिंपळनेर शहर या शहरात दररोज लाखोची आर्थिक उलाढाल होत असते आणि नगरपालिकेला नागरिकांकडून लाखोचा महसूल मिळत असतो परंतु शहरातील नागरिकांना न मिळणाऱ्या मुलभुत सुविधा व पिंपळनेर शहरातील नागरिकांना होणाऱ्या समस्यांच्या त्रासाबद्दल दुर्लक्ष करणारे नगरपरिषदेचे प्रशासन व अधिकारी यांच्या विरोधात संपुर्ण पिंपळनेर शहरातील नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे व उद्रेक होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे .त्याचाच भाग म्हणुन शहरातील मुख्य रस्त्यावर बर्याच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत आहे. शहरातील ठिकठिकाणी चौकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, दु्र्गंधी सुटल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन संतप्त नागरिकांनी व भाजप पदाधिकारी मिळुन नगरपरिषदेचे कार्यालयाला कुलुप लाऊन बंद करून निषेध केला आहे. नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तात्काळ उपाय करून निर्णय घ्यावा.अन्यथा पुढे तीव्र स्वरुपात जन आंदोलन केले जाईल.यावेळी पिंपळनेर शहरातील व्यापारी ,व नागरिक, तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे
Post a Comment
0 Comments