Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संविधानात हक्क आणि कर्तव्याबाबत प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे.. व्याख्याते डॉ.वसावे


 सहसंपादक अनिल बोराडे 


पिंपळनेर येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के.पाटील विज्ञान महाविद्यालयात आयोजित संविधान गौरव महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी  विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पवार, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश मस्के, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. के.एन.वसावे, विजया भामरे, छाया गांगुर्डे आदी उपस्थित होते.
   पिंपळनेर महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार भारतीय राज्यघटनेच्या 75 वर्षपुर्ती निमित्त संविधान गौरव महोत्सव अंतर्गत प्रा. डॉ. के.एन.वसावे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना डॉ. वसावे म्हणाले की, भारतात जी विविधता आढळते ती कुठेच दिसत नाही. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय संविधान हे होय. इतर देशाच्या तुलनेमध्ये भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाची सुरुवातच आम्ही भारताचे लोक इथून सुरुवात होते. त्यामुळे रयतेला सर्व सन्मान देण्यात आला आहे. या संविधानानुसार भारतातील सर्व जाती धर्मातील लोकांना सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील न्याय मिळतो. स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय हे मूल्य संविधानाने दिली त्यामुळेच या देशातील सर्व नागरिक विकास करू शकले. त्याचबरोबर हक्क आणि कर्तव्याबाबत प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे, असे डॉ. वसावे यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले.

संविधानात हक्क आणि कर्तव्य दिली आहेत. चे हक्का बरोबर कर्तव्याची ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.आपण व आपले शासन नियमानुसारच चालले पाहिजे. संविधान ही एक नियमावली आहे. कर्तव्याचे पालन केले पाहिजे. आपल्या हातून चांगले काम कसे होईल याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला पाहिजे असे मत पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव  ए. एस. बिरारीस यांनी अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.एल.बी.पवार म्हणाले की, संविधान हे सर्वोच्च आहे. त्यानुसार प्रत्येकानी आपल्या जीवनात तसे आचरण केले तर जीवन समृद्ध होते. त्याचबरोबर संविधानाचा अर्थ सांगून संविधानाविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण होणे ही काळाची गरज आहे. भारतीय संविधानाच्या 75 वर्ष पूर्ती निमित्त महाविद्यालयात वक्तृत्व ,वादविवाद व निबंध स्पर्धेचे ही आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे समन्वयक व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी केले.आभार प्रा. डॉ.एन.बी.सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. उगलमुगले,प्रा.बळसाने, प्रा.गवळी,प्रा.तोरवणे,प्रा.सोनवणे, डॉ.खरात, प्रा.घरटे,प्रा.बागुल,प्रा.सुभालकर, शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमासाठी  कैलास जिरे, सुनील पवार, रवी शेलार व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
* फोटो - पिंपळनेर महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव प्रसंगी संस्थेचे सचिव ए.एस. बिरारीस,प्राचार्य प्रो.एल.बी.पवार, डॉ. के. एन. वसावे,प्रा. सतीश मस्के,छाया गांगुर्डे, विजया भामरे आदी..

Post a Comment

0 Comments