Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

परमपूज्य संतोष महाराज यांचा उपस्थितीत व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन

सहसंपादक अनिल बोराडे 

साक्री तालुक्यातील काकसेवड पैकी चिंचपाडा येथे आज रोजी परमपूज्य संतोष महाराज यांच्या उपस्थितीत भव्य व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.




परमपूज्य शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी परमपुज्य संतोष महाराज हे या अगोदर  आले होते. त्यावेळी त्यांनी हजारो कुंटुंबाना व्यसनमुक्त केले आहे.

        या व्यसन मुक्तीचे प्रणेते प.पु. कै.

शेषराव महाराज यांचे पश्चिम पट्ट्यात अनेक ठिकाणी मंदिरे असुन काही ठिकाणी पुतळे उभारण्यात आले आहैत.

  आज काकसेवड पैकी चिंचपाडा येथे बोलतांना  कै.प.पु.शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी प.पु. संतोष महाराज यांनी सांगितले की  दारू सोडा संसार जोडा असे सांगून भाषणाला सुरुवात झाली दारूड्या बापाच कोण नाव काढेल कारण त्यापासून घरातील कोणाला सुख नाही, माणसाणे वर्तनात परिवर्तन केले म्हणजे दारू सुटते. चोवीस तास दारू पिणा-याची दारू सुटेल फक्त मनाची तयारी करा, देवाचा सत्संगाची वेळ ठरलेली असते त्यावेळेत तुम्ही आले म्हणजे तूमच्या कानी चांगले विचार पडतील. दारूमुळे अनेकांचे संसार व कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे दारू सोडण्यासाठी फक्त आणि मनाची तयारी व मनांवर नियंत्रण ठेवा. आज चिंचपाडा येथील कार्यक्रमात 400 ते 500 लोकांनी दारू सोडण्याचा संकल्प करण्यात आला. या वेळी व्यासपीठावरेन बोलतांना महारांजानी संकल्प करणा-यांना सांगितले की मनावर ताबा ठेवा व्यसन आपोआप सुटेल व आपला संसार सुरळीत होईल.

      व्यासपीठावर गोरख कुवर, चिंतामण गावीत, शिवाजी चौधरींच्या, आप्पा चौधरी, राजेश महाले, महारू माळचे, तुकाराम चौधरी, पंजाबराव पवार, देविदास बर्डे, पांडुरंग साबळे, चिंतामण बर्डे, बनचंद बर्डे, गुलाब चौरे,  हिंमत माळचे, युवराज बर्डे, दिलीप अहिरे, 

योगेश महाले व चंदु गांगुर्डे यांनी आपले विचार मांडले 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश महाले यांनी केले तर सुत्रसंचलन राजमल भोये यांनी केले.

Post a Comment

0 Comments