(
प्रतिनिधी) नवापूर शहरातील कसाईवाडा परिसरातील मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्यांमुळे नागरिक त्रस्त असुन हे कुत्रे रात्रभर भुंकतात आणि दिवसां वाहनधारकांचा मागे धावतात. पायी चालणाऱ्या लोकांना तसेच लहान शाळकरी विद्यार्थ्यांना या मोकाट कुत्र्यांचा त्रास होत आहे अंगावर धावून येणे असे अनेक लोकांना याचा दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे आशयाचे निवेदन डिजिटल मिडिया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष तसेच भीम ज्योत न्यूज चॅनल चे संपादक सुनील वाघ यांनी नगरपालिकेला दिले सदर निवेदनाची दखल न घेतल्यास नगरपालिके समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुनील वाघ यांनी दिला आहे
Post a Comment
0 Comments