नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम नर्मदा काठावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत नियमित आणि वेळेवर धान्य पुरवठा करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.
अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यांतील धान्य पुरवठा:
8 गावांतील 9 रास्तभाव दुकाने
दरमहा 382 क्विंटल धान्य पोहोचवले जाते
6500+ लाभार्थी योजनेचा फायदा घेत आहेत
बार्जद्वारे (नदीवरील मालवाहू बोट) धान्य वाहतूक
पुरवठा मार्ग आणि प्रक्रिया:
अक्कलकुवा तालुका:
महाराष्ट्रातील अक्कलकुवा गोदामातून, गुजरातमधील सागबारा-डेडियापाडा-राजपिपला-केवडिया कॉलनी (सरदार सरोवर धरण) मार्गे धान्य पाठवले जाते.
अक्राणी तालुका:
अक्राणी गोदामातून भूषा मार्गे बार्जद्वारे धान्य वाहतूक केली जाते.
पावसाळ्यात विशेष नियोजन – ‘नवसंजीवनी योजना’
चार महिन्यांचे धान्य (जून-सप्टेंबर) एकत्रित साठवणूक
अन्नसुरक्षेचा सातत्याने पुरवठा, कोणतीही अडचण नाही!
रास्तभाव दुकानांमार्फत सेवा देणारे दुकानदार:
मणिबेली – श्रीमती संगीताबाई दिलवरसिंग वसावे
चिमलखेडी – श्रीमती मोसराबाई लालसिंग वसावे व रेवा महिला बचत गट
धनखेडी – मौलीमाता महिला बचत गट
बामणी – श्रीमती संगीताबाई धरमसिंग वसावे
डणेल – श्रीमती वंदना नुरसिंग पाडवी
उडद्या – रंगल्या सुरज्या पावरा
भादल – गिलदर जुगण्या पावरा
भाबरी – शिवबाबा महिला बचत गट
प्रशासनाचा पुढाकार:
जिल्हा पुरवठा कार्यालय आणि तालुका पुरवठा कार्यालयांच्या नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला जात आहे. धान्य वेळेवर पोहोचल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments