अनिल बोराडे
कल्याण =सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे यंदाही कल्याण पूर्वेत शिवजयंती निमित्त भव्य शिव प्रेरणा यात्रा काढण्यात आली समितीच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवकल्याण पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा शिवकल्याण पुरस्कार विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणारे , कोरोनाच्या काळात शिक्षकांकडून आर्थिक मदत मिळवून दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून समाज उपयोगी काम करणारे सम्राट अशोक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक गुलाबराव पंडितराव पाटील यांना आमदार सुलभा गायकवाड,पोलीस उपायुक्त अतुलजी झेंडे, विश्वस्त भगवान भोईर, नरेंद्र सूर्यवंशी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा वंदना मोरे, माजी अध्यक्ष राजेश अंकुश, कृषी समितीचे सभापती दत्ता गायकवाड असे अनेक मान्यवरांच्या हस्ते शिव कल्याण पुरस्कार देऊन गुलाबराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी देखील गुलाबराव पाटील यांचा विविध सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र शासनाकडून राज्याचा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. गुलाबराव पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभागाचे अध्यक्ष असून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात. परिषदेचे कोकण विभागाचे कार्यवाह लक्ष्मण बालगुडे, राज्याचे उपाध्यक्ष एकनाथ दळवी व राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment
0 Comments