अनिल बोराडे
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोलिस बॉईज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य प्रचारक पांडुरंग बाबुलाल पिसुळ यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व बालगोपालांना शिक्षण साहित्य व मिष्टान्न चे वाटप करण्यात आले
गंगोत्री पार्क वडगाव बजाजनगर. छत्रपती संभाजी नगर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे प्रचारक पांडुरंग बाबुलाल पिसुळ हे व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन वेळी लहान कलाकारांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देत पवाडे गायले भाषणेही देत देशभक्ती गितांवर वेशभूषा परिधान करून सर्वांचे मने जिंकली व लहान कलाकारांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व मिठाई देखील वाटण्यात आली शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय भवानी जय शिवाजी जयघोषाने परीसर दुमदुमले होते
पोलिस बॉईज असोसिएशन चे राज्य प्रचारक पांडुरंग बाबुलाल पिसुळ हे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून असोसिएशन च्या माध्यमातून कार्य करीत आहेत
Post a Comment
0 Comments