Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वनविभागाने सुमारे दिड लाखाचे सागवान लाकूड केले जप्त

 प्रतिनिधी नवापूर 




दिनांक 21/02/2025 रोजी सायंकाळी मिळालेल्या गुप्त बातमीवरून म.सहाय्यक वनसंरक्षक प्रा.व वन्यजीव नंदुरबार म.वनक्षेत्रपाल नवापूर (प्रा.) व रेंज स्टाफ नवापूर प्रा.  मौजे करंजी खुर्द येथील पोल्ट्री फॉर्म जवळ जाऊन पाहणी केली असता शेतात अवैधरित्या सागवृक्षाची तोड केलेली दिसली तरी आजूबाजूस आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही तरी माल जप्त करून  सदर मुद्देमाल वनकर्मचारी यांनी  जागेवरच मोजमाप घेऊन शासकीय वाहनात भरून  शासकीय वाहनाने शासकीय विक्री आगार नवापूर येथे  आणून पावतीने जमा केला.  सदर मालाचे मोजमाप केले असता साग गोल नग - 16 घ.मी. 1.150 सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत 1 ते 1.5 लाख रुपये एवढी आहे. 

सदर कारवाई  मा.श्रीमती निनू सोमराज मॅडम, वनसंरक्षक धुळे( प्रा.)मा.श्री.संतोष सस्ते साहेब उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार ,मा. राजेंद्र सदगीर साहेब विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे मा. धनंजय ग.पवार साहेब सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कार्यवाहीत मा.धनंजय ग.पवार साहेब सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार , मा.स्नेहल  चं.अवसरमल मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक ,वनपरिक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक मधील वनपाल व वनरक्षक वाहन चालक तसेच संरक्षण मजूर यांनी सहभाग घेतला.

मा. वनपरिक्षेत्राधिकारी नवापूर प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनपाल वडकळंबी करीत आहेत .

Post a Comment

0 Comments