Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धावत्या रेल्वेतून पडून एक इसम गंभीर जखमी


 
नवापूर प्रतिनिधी 


प्राप्त माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास नवापूर तालुक्यातील शास्त्रीनगर भागातील रेल्वे गेट क्रमांक ६८ जवळ एक दुर्दैवी घटना घडली एक गुरे चारणार्या युवकाला रेल्वे गेट क्रमांक ६८ जवळ रेल्वे रुळाच्या बाजूला एक इसम गंभीर अवस्थेत आढळून आल्याने त्याने लागलीच परिसरात नागरिकांनी कळविले व लोकांनी त्या दिशेने धाव घेतली असता रेल्वे रुळाच्या बाजूला एक इसम गंभीर अवस्थेत आढळून आला त्यानी लागलीच १०८ रुग्णवाहिकेवाला कॉल करून पाचारण केले असता १०८ रुग्णवाहिकेचे चालक लाजेरेस जी यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत टाकून सदर जखमी इसमाला नवापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सदर इसमाचे नाव मिटु असुन तो सुरत हुन बंगाल जात होता असे प्राथमिक माहिती समोर आली आहे गेल्याच आठवड्यात रेल्वेत हाणामारीमुळे एका ला आपला जीव गमवावा लागला होता यावर नवनिर्वाचित जिल्हा संपर्कप्रमुख मंत्री श्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्हा रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले होते आणि परत आज ही अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्युज चॅनल नेटवर्क

Post a Comment

0 Comments