जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी रसीक गावीत
नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी शिवजयंती उत्सव तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थिती मुळे जिल्हा प्रशासनाने 14 दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये सदर आदेश जारी केले असून.आदेशातील महत्त्वाचे नियम: पुढील प्रमाणे
शस्त्रबंदी ,तलवारी, लाठ्या, बंदुका किंवा कोणतेही घातक हत्यारे बाळगण्यास मनाई.
जमावबंदी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी.
मिरवणुका व घोषणा कोणत्याही प्रकारच्या मोर्चा किंवा भाषणांवर निर्बंध.तसेच यात विशेष सवलती देण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना लाठी वापरण्यास परवानगी.शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकृत कर्तव्यांसाठी शस्त्र बाळगण्याची मुभा.विवाह सोहळे, अंत्ययात्रा आणि आठवडे बाजार यांना सवलत. संपूर्ण जिल्ह्यात कडक अंमलबजावणी चे आदेश देण्यात आले आहेत जर
आदेशाचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
स्थानिक पोलीस विभाग योग्य ती कारवाई करणार.नागरिकांनी शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांना केले आहे नियमांचे काटेकोर पालन करा विद्यार्थ्यांसाठी शांततामय वातावरण निर्माण करा सामाजिक सलोखा टिकवून ठेवा
Post a Comment
0 Comments