Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र मंजूर - ॲड. मनोज सुर्यवंशी यांच्या मागणीस यश



प्रतिनिधी-नंदूरबार जिल्हा हा अतिदुर्गम भाग असून या भागातील अनेक होतकरू विद्यार्थी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे घेण्यात येणारी उच्चस्तरीय असलेली सेट परीक्षेकरीता परीक्षा केंद्र नसल्यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. 

          परिक्षार्थी यांना जिल्ह्यातील दुर्गम भागातून बाहेरगावी परीक्षा केंद्र पर्यंत जाणे करीता आर्थिक, शारीरिक, मानसिक यांसह अनेक जाचास सामोरे जावे लागत होते. परिक्षार्थी यांना या जाचातून मुक्तता करणे करीता संभाजीनगर उच्च न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत सामाजिक व्यक्तिमत्व ॲड. मनोज रमेश सुर्यवंशी यांनी वेळोवेळी विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे मागणी करून सतत पाठपुरावा करत होते.

            त्यास विद्यापीठ प्रशासनाकडून नंदूरबार जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आले आहे.

       या करिता विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. राहुल पाखरे यांनी हि विद्यापीठ प्रशासन यांच्याशी सतत समन्वय साधत मागणीस पाठपुरावा करण्यात सहकार्य लाभले.


      परीक्षा केंद्र मंजूर झाल्याने परीक्षार्थी यांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान - ॲड. मनोज सूर्यवंशी.

      जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी व परीक्षार्थी यांना परीक्षेदरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते व यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व गोष्टींचा त्रास अनेकांना सहन करावा लागत होता... स्वतंत्र परीक्षा केंद्र मंजूर झाल्याने अनेक परीक्षार्थ्यांना न्याय मिळवून देता आल्याचे समाधान आहे व विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त करतो.

नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात नंदुरबार परीक्षा केंद्राला पसंती देण्याचे आवाहन करतो.

Post a Comment

0 Comments