सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर- कै.आ.मा.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी संचलित व एस.एन.डी.टी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नवीन शैक्षणिक धोरणावर पोस्टर प्रदर्शन व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमापूजन व छञपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहितीपर कार्यक्रम श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय,पिंपळनेरच्यावतीने संपन्न झाला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.
या प्रसंगी प्रा.टी.जे.साळवे ,प्रा.एन.एस.खैरनार,प्रा.जी.एस.निकम आदि. मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थित होते.विदयाथीॅ शिक्षिका उपस्थित होते.प्रदर्शनात छञपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक विषयाची माहिती मिळाली. केले.सदर कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या निमित्ताने नवीन शैक्षणिक धोरणावर पोस्टर प्रदर्शन हा वेगळा उपक्रम घेतल्यामुळे सर्वांनी त्यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमात शैक्षणिक धोरणावर,छञपती शिवाजी महाराज यांच्यावर प्राचार्य डॉ.सतीश पाटील,प्रा.टी.जे.साळवे तसेच विद्यार्थी शिक्षिका कल्याणी भामरे,योगिता ठाकरे यांचे छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रेरणादायी भाषण, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा निर्माण झाली, जिथे विद्यार्थ्यांनी निष्ठा, प्रामाणिकतेची शपथ घेतली.
कार्यक्रमाचा शेवट भव्य किल्ला प्रदर्शनाने झाला, जिथे विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक गड-किल्ल्यांची माहिती सांगून इतिहासाचे स्मरण करून दिले.तसेच विद्यार्थी शिक्षकांनी स्वतः नवीन शैक्षणिक धोरणावर तक्ते पोस्टर्स स्वरुपात तयार करून विद्यार्थी शिक्षकांनी प्रदर्शन मांडून त्याचे उद्घाटन केले.पोस्टर्स तयार करण्यासाठी गायत्री दशपुते,चेतना सावंत,दामिनी सोनवणे,योगिता ठाकरे,निकिता गावित,उज्वला शिंदे,योगेश्वरी सुर्यवंशी,सीमा जाधव,कल्याणी भामरे,पूजा नरवाडे,छकुली बागले यांनी परिश्रम घेतले,सूञसंचलन सीमा जाधव,प्रास्ताविक गायञी दशपुते,तर आभारप्रदर्शन योगिता ठाकरे यांनी केले.
Post a Comment
0 Comments