Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात साजरी


 नवापूर :दि १९फेब्रुवारी बुधवार रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जन्म जयंती उत्साहत साजरी करण्यात आली नवापूर शहरातील सरदार चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होती सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार सर्व मान्यवाराकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भरत माणिकराव गावित होते तर या कार्यक्रमा वेळी चंद्रकांत नगराळे,कमलेश पाटील, शिवशाहीर सुनील पवार, मराठा सेवा संघ चे अहिराव सर,आदिनी आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या कार्याचा गौरव करत इतिहासाला उजाळा दिला कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती चे सदस्य संजय आतारकर, पंकज गोसावी, भाविन आतारकर काना आतारकर आकाश कुराडे,सुरज चव्हाण, अजय कुराडे यांच्या कडून करण्यात आले या शिव जयंतीला राजकीय सामाजिक तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे सूत्रसंचालन जितेंद्र अहिरे यांनी केले तर आभार राहुल मराठे यांनी मानले 

Post a Comment

0 Comments