सहसंपादक अनिल बोराडे
कळवण तालुक्यातील नांदुरी ग्रामपंचायतीच्या वतीने गावकऱ्यांना साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील पद्मश्री पुरस्कार विजेते चैताराम पवार यांनी गेल्या पस्तीस वर्षापासुन केलेल्या जंगल सवंर्धनाची सफर करत जंगल पाहणी करून माहिती घेत आपल्या नांदुरी गावीही हा जंगल संवर्धनाचा उपक्रम राबवीला पाहिजे असाच जनू चंग बांधला.
यावेळी पद्मश्री पुरस्कार विजेते चैताराम पवार यांनी उपस्थित गावकऱ्यांना यासाठी काय करावे लागते याचा पाढाच सांगितला यासाठी सर्वप्रथम गावात एकी असली पाहिजे. राजकारण एका बाजूला आणि गावाचा विकास एका बाजूला यासाठी पंचसुत्री कार्यक्रम आखणे महत्वाचे असतो जल, जंगल,जमिन, जनावर आणि जन असा हा पंच सुत्री कार्यक्रम हाती घेतल्याने हे शक्य झाले. तसेच गावाच्या परीसरात चार हजार मोहाचीं झाड असुन प्रत्येक वर्षाला एका झाडापासुन एक लाख रुपया़चे उत्पन्न गावाला मिळत असुन मोहाच्या झाडापासुन मिळणाऱ्या फुलांचे मनुके, साबन, चॉकलेट, तेल,व्हासलीन, आदी उपयोगी वस्तूनां देशात नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असल्याचे सांगितले तसेच जंगलात गावाच्या श्रमदानातून पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याने माती वाहून जाऊ नये यासाठि 425 ठिकाणी दगडाच्या सोलींग रचल्या तसेच 30 हेक्टर मध्ये 8340 झाडांचे जतन केले असुन प्रत्येक झाडाला क्रमांक असल्याचे निदर्शनास आले.
नक्कीच नांदुरीकरांनी केलेली बारीपाड्याची सफर प्रेरणादायी ठरली असुन लवकरच गावाची विषेश ग्रामसभा घेऊन गावकरी या पंचसुत्रीचे अवलबंन करणार असल्याचे जेष्ठांनी सांगितले.
चौकट:-मी गेल्या सहा वर्षापुर्वी बारीपाडा या आदर्श गावी गेलो होतो तेव्हापासून गावातील तरुणांना व जेष्ठांना या बारीपाड्याच्या जंगलाला भेट देण्याचा निश्चय केला होता. यासाठी वेळोवेळी गावकऱ्यांना घेऊन जाण्याचा अग्रह करत होतो त्याला काल मुहूर्त लागला गावातील तब्बल 65 जनांना घेऊन जाण्याचा योग मिळाला. जेव्हा जंगलात जाण्यासाठी घुसलो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द होता की आपल्या गावातील जंगल तर यापेक्षा ही दाट आहे तर आपणही असा उपक्रम राबवू हे ऐकल्याने जंगल सफर यशस्वी झाला असे वाटले.
-- मा. सरपंच सुभाष राऊत नांदुरी
आम्हा गावकऱ्यांना बारीपाडा येथील जंगल अभ्यास दौऱ्यासाठी ग्रामपंचायतीने जे प्रयोजन केले ते खुप छान होते अनेकदा काही गावचे लोक हे आदर्श गावांना भेटी देतात पण आम्ही पहिल्यांदा जंगलाचा अभ्यास दौरा केला निश्चितच राज्यातील प्रत्येक गावाने या बारीपाड्याला भेट दिली पाहिजे व गावाचे उत्पन्न वाढून जंगलाचा व गावाचा विकास केला पाहिजे.
-- वसंत गवळी जेष्ठ नागरिक नांदुरी
Post a Comment
0 Comments