Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उद्यापासून संवाद चिमुकल्यांशी अभियानाला सुरुवात


 

जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी=रसीक गावीत 

आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून उद्या दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. 

या अभियानाच्या माध्यमातून अधिकारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शालेय जीवनातील विविध अडचणी जाणून घेतील. या अंतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहात अधिकारी व कर्मचारी मुक्कामी राहून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतील. मुलींच्या आश्रमशाळेसाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments