सहसंपादक=अनिल बोराडे
चार हजार किलोमीटरचा प्रवास सानिया रनिंग करून करणार पूर्ण...
काश्मीर येथील लालचौका पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकात्मतेचा संदेश देत 14 वर्षीय सोनिया पांचाल ही 9 वीत शिकणारी विद्यार्थिनी धावत निघाली असून सोनियाने या आपल्या प्रवासाला जम्मू कश्मीर येथील लाल चौकापासून सुरुवात केली आहे... काश्मीर ते कन्याकुमारी हे 4000 किलोमीटर चे अंतर ती 121 दिवसात पूर्ण करण्याचे ठरवले असून तिने मानस व्यक्त केला आहे. सोनिया पांचाल हिचे धुळे शहरात धुळे युथ क्लबच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सानिया पांचाल या नववीत शिकणाऱ्या तरुणीने महिलांमध्ये जागृती करण्यासाठी व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हा प्रवास करत असल्याचे तिने यावेळी सांगितले. तिने तिच्या शालेय जीवनात 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत दोन सुवर्णपदक देखील पटकावले आहेत... येणाऱ्या काळात तिला अथलेटिक व्हायचे चे स्वप्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले...
Post a Comment
0 Comments