संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असताना काल या सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी धुळ्यात माध्यमांशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत झालेल्या सोयाबीन खरेदीला जानेवारीपासून आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली असून आता देखील आपण मुदतवाढीबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे.
भारताच्या इतिहासात महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास सव्वा 11 लाख टन इतकी सोयाबीन खरेदी झाली असून साडेचार हजार रुपये भावाने सोयाबीनची खरेदी झाल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती देखील यावेळी जयकुमार रावल यांनी दिली....
Post a Comment
0 Comments