"सहसंपादक=अनिल बोराडे"
पिंपळनेर दि. 30/01/2025मानवी जीवनासाठी संशोधन काळजी गरज झाली आहे. संशोधनामुळे प्रत्येक राष्ट्राची प्रगती होत असते. संशोधन नेमके केव्हा कसे आणि का करावे,त्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, राष्ट्रहितासाठी संशोधनाचे फायदे कसे महत्त्वाचे आहेत याची माहिती आयसीटी मुंबईहुन आलेले मराठी विज्ञान परिषदेचे प्रचारक अक्षय गिरासे यांनी दिली.
पिंपळनेर येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. आण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान महाविद्यालयाचे विज्ञान मंडळ व मराठी विज्ञान परिषद साक्री विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "विज्ञान संशोधनाकडे वळूया" या उपक्रमाप्रसंगी विज्ञान मंडळाचे उद्घाटक साक्री येथील सी. गो.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, मराठी विज्ञान परिषदेचे अक्षय गिरासे, कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.लहू पवार, विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ.नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.
गिरासे पुढे म्हणाले की महाविद्यालयीन तरुणांनी दैनंदिन अभ्यासासोबत आपला जास्तीत जास्त वेळ संशोधनासाठी आतापासूनच व्यतीत करावा, यासाठी तरुण संशोधकांनी एकमेकांशी स्पर्धा करण्याचे आवाहन केले.
विज्ञान मंडळाचे उद्घाटक व मराठी विज्ञान परिषदेचे साक्री विभागाचे सचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे यांनी महाविद्यालयीन युवकांनी अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे. जेंव्हाजेंव्हा आपल्या आवतीभॊवती चुकीच्या गोष्टी घडत असतील, अशा समाज विघातक घटनांना वेळीच आवर घातला पाहिजे. त्यामुळे निकोप समाज आपल्या संशोधक वृत्तीमुळे तयार होण्यास मोलाची मदत होईल असे प्रतिपादन केले.
पिंपळनेर महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.लहू पवार यांनी सांगितले की विज्ञान हे प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. त्यांनी "विज्ञानाची कास धरा" ही गोष्ट सांगून अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.नितीन सोनवणे यांनी केले. आभार प्रा. भूषण वाघ यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.प्रथम सूर्यवंशी, प्रा.हितेश वानखेडे, प्रा.भूषण वाघ, प्रा. तुषार तोरवणे,प्रा.पूजा सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळनेर वरिष्ठ महाविद्यालयात विज्ञान संशोधनाकडे वळूया कार्यक्रमात बोलतांना अक्षय गिरासे, समवेत प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, प्राचार्य प्रो. लहू पवार, डॉ. नितीन सोनवणे आदी.
Post a Comment
0 Comments