सहसंपादक=अनिल बोराडे
निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील टिटाणे गावाचे शिवारात दिनांक २५/०१/२०२५ रोजी पहाटे ०२.०० वाजेच्या सुमारास सुघलॉन ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीचे टॉवर क्रमांक V-१८ मधील ८४,०००/- रुपये किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ००१५/२०२५ बीएनएस कलम ३०५,३३१ (४), ३(५) प्रमाणे दि.२५/०१/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनी/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षींदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे ०१. जयेश सोनु बागुल, २) मनोहर रोहीदास बगुल दोन्ही रा. सिंदबन ता. साक्री जि.धुळे, ३) शेख साबीर शेख शब्बीर पिंजारी, रा. शास्त्रीनगर नंदुरबार ता. जि. नंदुरबार ४) जितेंद्र ऊर्फ जितु रंजित पवार ५) ललीत चुनीलाल चौरे दोन्ही रा. वाल्हवे ता. साक्री जि.धुळे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन । गुन्हा करतांना वापरलेली मारुती कंपनीची रिट्स कार, हिरोहोंडा कंपनीची फॅशन मोटार सायकल व चोरीस गेलेली कॉपर केबल व इतर मुद्देमाल असा एकुण ३,८६,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त करुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/श्री मयुर भामरे, पोउनि/प्रदिप सोनवणे, पोउनि/मधुकर सोमासे, असई/रुपसिंग वळवी, पोहेकॉ / प्रशांत ठाकुर, पोहेकॉ/नारायण माळचे, पोहेकॉ/रतन मोरे, पोहेकॉ/नागेश्वर सोनवणे, पोहेकॉ / प्रदिप आखाडे, पोकॉ/सागर थाटसिंगारे, पोकॉ/कृष्णा भिल, पोकॉ/पृथ्वीराज शिंदे, पोकॉ/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/गौतम अहिरे, पोकॉ/२८४ सुनिल अहिरे यांचे पथकाने केली आहे.
Post a Comment
0 Comments