🖋️सहसंपादक=अनिल बोराडे📄
पिंपळनेर आदर्श गाव संकल्पनेचे प्रणेते पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार यांचा भारतीय किसान संघाच्या जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी सदस्यांकडून सत्कार करण्यात आला .तसेच शाश्वत ग्राम विकास या विषयावर प्रबोधन सत्राचे आयोजन चैत्राम पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले .चैत्राम पवार यांनी आपण सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व वनवासी कल्याण आश्रमाच्या मार्गदर्शनाने जल ,जंगल ,जमीन व पशुधन या पंचसूत्रीचा वापर करून कशा पद्धतीने शाश्वत विकास साधला याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी किसान संघाच्या कार्यकर्त्यांना केले .या अभ्यास दौऱ्यामध्ये चैत्राम पवार यांच्या मार्गदर्शनाने बारीपाडा येथे बारीपाडा ग्रामस्थांनी केलेले जंगल संवर्धन व जल व्यवस्थापन यांचा किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला .यावेळी भारतीय किसान संघाचे प्रांत मंत्री सुभाष महाजन ,जिल्हा अध्यक्ष साहेब जैन जैन ,जिल्हा उपाध्यक्ष शांताराम शिंदे, जिल्हा कारणीचे जेष्ठ सदस्य विश्वासराव अहिरराव पाटील ,जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटोळे ,जिल्हा मंत्री दत्तू माळी जिल्हा कार्यकारणी सदस्य जी व्ही पाटील ,जिल्हा कार्यकारणी सदस्य उत्तम तावडे, उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन भारतीय किसान संघाचे प्रांत सदस्य साहेबराव पवार यांनी केले यावेळी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक नाना जोशी उपस्थित होते. (हे ही होते उपस्थित - अरुण चितोडकर भरत देवरे संजय बागुल रणवीर पाटील गोटू सिंग राजपूत दुर्गेश सोनवणे रितेश पाटील प्रभाकर चौधरी विशाल वाणी मोतीलाल पोद्दार आदी उपस्थित होते)
Post a Comment
0 Comments