प्रतिनिधी=नवापूर शहर
डॉ.बाबासाहेब पुतळा परिसरातील समस्या बाबत काल प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नवापूर शहरातील नवापूर नगरपरिषद हद्दीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दर्शनी भागात असून या परिसरात अनेक समस्या आहेत. त्यात परिसरात लावण्यात आलेले वृक्षांच्या अनावश्यक फांद्या आहेत व याच ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाक
ठेवण्यात आलेले आहेत तेथे कधीही या फांद्या हवेने पडून यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत
नाही तसेच पुतळ्यावर पडल्यास पुतळा देखील खंडित होऊ शकतो. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बाकवर ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी येऊन बसतात त्यात काही लोकं पान गुटखा खाऊन तेथेच
थुंकतात आणि तेथे ठेवण्यात आलेले बाकची दिशा देखील बदलविणे आवश्यक आहे जेणेकरुन डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे कोणीही पाठ करुन बसणार नाही. याठिकाणी अनेक व्यावसायिक त्यांचे लॉऱ्या व स्टॉल लावतात आणि या परिसरात शहरातील जाहीरात, शुभेच्छांचे किंवा मृत व्यक्तीचे फलक होर्डिंग बॅनर देखील लावतात. याच ठिकाणी व्यवसायानिमित्त तीनचाकी, चारचाकी वाहने, लॉरी, स्टॉल लावणारे व्यावसायिक त्यांचा उरलेला माल ओला व सुका सर्व तेथेच फेकून जातात.परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे आवश्यक आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनाचा घटना वारंवार होत असून अशा घटना होऊ नये या करीता शासनाने
लक्ष देणे आवश्यक आहे या बाबी अतिशय गंभीर असल्याने योग्य ती कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी.याअगोदर देखील पत्रव्यवहार करण्यात आला होता परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही निवेदनात म्हटल्या प्रमाणे लवकरात लवकर या सर्व समस्यांचे निराकरण करावे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल सदर चा निवेदनावर भिम सैनिक व भिम अनुयायी चे उमेश पवार,कुणाल नरभवन,विरसिंग कोकणी,अतुल मावचीं,अनुप गावीत,साहिल सैय्यद,रोहन पवार,अभास शेख,बिलाल शेख,राजुव खान,हमजा मकरानी आदीचा सह्या आहेत
Post a Comment
0 Comments