काल आरोग्यदूत हेल्थकेअर सेंटर, महाराणा प्रताप चौक नवापूर मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या माध्यमातून दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात येथील हॉस्पिटलचे अधिकृत मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या शिबिर सेंटरच्या शुभारंभ तहसीलदार श्री दत्तात्रय जाधव, यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष श्री दामू अण्णा बिराडे होते शिबिरात 220 रुग्णांची तपासणी करण्यात आली यात बावीस रुग्णांना मोफत ऑपरेशन साठी, दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात या ठिकाणी लक्झरी बसच्या माध्यमातून पाठविण्यात आले शंभरच्या वर रुग्णांना वीस रुपयांमध्ये अल्पदरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले आहे
त्याचप्रमाणे यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कायमस्वरूपी नवापुरातच भव्य मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर हॉस्पिटलचे अधिकृत सेंटर सेवा शुभारंभ करण्यात आले असून नवापुरातील गरजूंना यापुढे ही दर महिन्याचा चौथ्या शुक्रवारी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला सकाळी 09 ते दुपारी 01 वाजेपावेतो मोफत डोळ्यांची तपासणी,ऑपरेशन, अल्प दरात चष्मे वाटप तसेच ऑपरेशन पात्र रुग्णांना मांडवी हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी गाड्यांची व जेवनाची व्यवस्था करण्यात येणार आहे
तरी राहीलेल्या रुग्णांनी पुढच्या महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक पावेतो पुन्हा या डोळे शिबिराचा लाभ घेऊन आपले डोळ्यांचे आरोग्य चांगले करावे व या सेवेचा नवापुर करांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य दूत तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पाटील यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्युज चॅनल नेटवर्क
Post a Comment
0 Comments