Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान

 प्रतिनिधी=नवापूर


राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम नंदुरबार महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान निमित्त नवापूर उपजिल्हा रुग्णालयात येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सर्व प्रथम नवापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक डॉ अनिल गावीत यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनिषा वळवी, डॉ सुनिल गावीत,डॉ प्रिती गावीत,डॉ किर्तीलता वसावे,डॉ कंचन वसावे,डॉ प्रमोद कटारीया,डॉ प्रदिप गावीत,फार्मसी ऑपीसर,मयुरी सुर्यवंशी,सुषमा सेलार,शिष्टर शबरी गावीत,जोयस वळवी,साई नसिंग कॉलेजचे मुख्याध्यापक सागर वसावे,गिता गावीत,कुसुम गावीत आदी उपस्थित होते.यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ अनिल गावीत म्हणाले की हा कुष्ठरोग अभियांन ३० जानेवारी ते १३ फ्रेब्रुवारी पर्यत राबविण्यात येणार आहे.या पधंरवाड्यात विविध पदके तयार करण्यात आले असुन घरोघरी भेटी देऊन संशयित रुग्ण आढळ्यास त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवुन औषधी उपचार करा. या आजाराला घाबरुन न जाता निसंकोच पणे कोणताही न्युनगंड न ठेवता लोकांनी उस्फुर्तपणे  पुढे येऊन या अभियानात सहभागी व्हा. जेने करुन कुष्ठरोगाचा संबंधीत रुग्णांचा जीवनावर परिणाम करतात. त्याला सामाजिक स्थिती रोजगाराची संधी विवाह कुंटुबीक जिवन इत्यादी व भेदभावाची निराकरण करण्यासाठी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन अभियांन राबविण्यात येत आहे.या नंतर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन अभियांन रँलीला हिरवा झेंडा डॉ अनिल गावीत यांनी देऊन शुभारंभ केला रँली नवापूर उपजिल्हा रुग्णालया पासुन सुरुवात करत श्री साईबाबा मंदीर रोड,बसस्थानक परीसर,लाईटबाजार येथे फिरुन महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण डॉ अनिल गावीत व अधिकारी,कर्मचारी यांनी केला त्या नंतर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन पंधरवाडा संदर्भात साई नर्सिंग कॉलेज व कै.विलासराव देशमुख नसिंग कॉलजच्या विद्यार्थीनी  पथनाटय सादर केले या कार्यक्रमाचे सुञसंचलन समुउपदेशक कैलास माळी यांनी केले तर आभार कुष्ठरोग तंत्रज्ञ सुरेश बागुल यांनी मानले.


Post a Comment

0 Comments