Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अज्ञात वाहनाने मालवाहतूक रिक्षाला दिली धडक

 ‍आज्ञात वाहनाने मालवाहतूक रिक्षाला दिली धडक .



सविस्तर वृत्त असे की. काल दिनांक ३० जानेवारी गुरुवार रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास  विसरवाडी रिलायन्स पेट्रोल पंप समोर नवापूर येथून आपली मालवाहतूक रिक्षा  क्रमांक  जि जे१७वाय ८८३७  मार्गक्रमण  करत असतांना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने मालवाहतूक रिक्षाला दिल्याने रिक्षा पलटी झाली होती.

प्रतिनिधी


गणेश सोनवणे 


 रिक्षाचालक जाकीर हा राहणार नवापूर हा तरुण या अपघातात  गंभीर जखमी झाला होता .घटनेची   माहिती मिळतात नाळीज धाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .

विसरवाडी येथील रिलायन्स पेट्रोल पंप समोरून नंदुरबार बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु बायपास हा फक्त नावालाच तिकडे कोणत्याही प्रकारचे बॅरॅकेट किंवा स्टिकर लावण्यात आलेले नाही अशातच स्थानिक नागरिकांना अपघाताचे सामोरे जावे लागते  अपघातांचा  एकही दिवस सूटेना.....

तरीही प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी  त्यांचे ठेकेदार  यांना काही फरक पडत नाही ..........

 

Post a Comment

0 Comments