Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नगराध्यक्षांच्या निवासस्थानी भाऊबीजेचा स्नेहसोहळा! भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते अन् सफाई कर्मचाऱ्यांचे औक्षण करून दिला सन्मानाचा गोडवा!

 नगराध्यक्षा डॉ. योगिताताई चौरे व डॉ. जितेश चौरे यांचा स्तुत्य उपक्रम दिवाळीच्या आनंदात सामाजिक बांधिलकीचा जिव्हाळा

पिंपळनेर.. सहसंपादक अनिल बोराडे 

दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई, फराळ आणि आनंदाचा उत्सव नव्हे, तर नात्यांमधील जिव्हाळा, आपुलकी आणि माणुसकीची वीण अधिक घट्ट करणारा सण! याच भावनेचा सुंदर प्रत्यय पिंपळनेर येथे आला. पिंपळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. डॉ. योगिताताई चौरे आणि सुहरी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जितेश जी. चौरे यांनी आपल्या निवासस्थानी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे उपनगराध्यक्ष योगेश जी नेरकर, सभापती सतिष शिरसाठ, सभापती डॉ विनोद कोठावदे,सभापती डॉ.प्रशांत बागुल, नगरसेवक डॉ.मिलींद कोतकर,,सह सभापती, नगरसेवक, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी करत स्नेह, बंधुभाव आणि सामाजिक समरसतेचा अनोखा संदेश दिला.



या स्नेहसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाही या आनंदोत्सवात सन्मानाने सहभागी करून घेण्यात आले. नगराध्यक्षा डॉ. योगिताताई चौरे यांनी उपस्थितांचे औक्षण करून भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असून, सण-उत्सवांचा आनंद सर्वांनी एकत्रितपणे साजरा करावा, हा जिव्हाळ्याचा संदेश अधोरेखित झाला.



यावेळी नगराध्यक्षा सौ. डॉ. योगिताताई चौरे व सुहरी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जितेश जी. चौरे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सफाई कर्मचाऱ्यांचे आपुलकीने स्वागत केले. दिवाळी व भाऊबीजेच्या मंगलमय शुभेच्छा देत सर्वांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. घरगुती वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे आणि आपलेपणाचे वातावरण निर्माण झाले.


या प्रसंगी पिंपळनेर नगरपरिषदेच्या सभापती सौ. प्रज्ञाताई बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष सौ. सविताताई पगारे, नगरसेविका सौ. मनीषाताई ढोले, नगरसेविका सौ. लिलाबाई राऊत, नगरसेविका सौ. मायाबाई पवार,आशाताई महाजन यांनी उपस्थित सभापती नगरसेवक तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरपरिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांचे औक्षण केले




आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या सामाजिक वातावरणात सण-उत्सवांच्या माध्यमातून माणसांना जोडण्याचे काम अशा उपक्रमांमुळे घडते. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना सणाच्या आनंदात सहभागी करून त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे, ही या सोहळ्याची विशेष जमेची बाजू ठरली. भाऊबीजेच्या निमित्ताने औक्षण, शुभेच्छा आणि आपुलकीच्या भेटीगाठींनी चौरे निवासस्थानात आनंदाचे वातावरण फुलले.


एकंदरीत, नगराध्यक्षा डॉ. योगिताताई चौरे व डॉ. जितेश जी. चौरे यांनी आयोजित केलेला हा भाऊबीजेचा स्नेहसोहळा केवळ दिवाळीचा कार्यक्रम न ठरता सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरला.

Post a Comment

0 Comments