Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राजे छत्रपती स्कूलची जूडो स्पर्धेत गगनभरारी: १७ खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड

 पिंपळनेर (सहसंपादक, अनिल बोराडे):


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय जूडो क्रीडा स्पर्धेत पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अद्वितीय यश संपादन केले आहे. तब्बल १७ खेळाडूंनी विविध वयोगट आणि वजन गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावरील जूडो स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. या घवघवीत यशामुळे पिंपळनेरच्या क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विजयी खेळाडूंची यादी (वयोगट व वजन गटानुसार):

१४ वर्षांखालील मुली:

 * ३२ किलो: मोगी भूरू ठेंगे

 * ४४ किलोपेक्षा अधिक: शालोनी कुवर

१७ वर्षांखालील मुली:

 * ३६ किलोखालील: सोनम बागुल

 * ४४ किलोखालील: हर्षाली कुवर

 * ५२ किलोखालील: हिना भोये

१९ वर्षांखालील मुली:

 * ४४ किलोखालील: भाग्यश्री जगताप

 * ५७ किलोखालील: अनुष्का शिरसाट

१४ वर्षांखालील मुले:

 * २५ किलोखालील: दर्शन पाटील

 * ४० किलोखालील: आकाश टकले

 * ४५ किलोखालील: स्वामी भदाणे

 * ५० किलोपेक्षा अधिक: आर्यन मोरे

१७ वर्षांखालील मुले:

 * ४० किलोखालील: मुकेश सुळ

 * ४५ किलोखालील: साजन चौरे

 * ५० किलोखालील: साई सरडान

 * ५५ किलोखालील: रितेश साळुंखे

 * ६६ किलोखालील: जयपाल गिरासे

१९ वर्षांखालील मुले:

 * ४० किलोखालील: लोकेश सूर्यवंशी

कठोर सराव आणि मार्गदर्शनाचे फलित

शाळेमध्ये नियमित आणि तंत्रशुद्ध सरावावर भर दिला जातो. या सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थेचे चेअरमन श्री. संभाजी शिवाजी अहिरराव, क्रीडा मार्गदर्शक अमोल सर आणि गायकवाड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कौतुक आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा

एकाच शाळेतील १७ खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या सोनाली पाटील मॅडम, सचिव राणा पाटील सर, संचालक जगदीश ओझरकर आणि उपाध्यक्ष श्याम कोठावदे यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. जिल्हास्तरावरील या दिमाखदार यशा नंतर आता हे खेळाडू विभागीय स्पर्धेतही सुवर्णकामगिरी करण्यासाठी सज्ज झाले असून, संपूर्ण पिंपळनेर परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments