Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

लाखाणी पार्कमध्ये वक्रतुंड गणेश मंडळाचा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न; महाआरती आणि मान्यवरांच्या सत्काराने भक्तिमय वातावरण

 नवापूर (प्रतिनिधी):

लाखाणी पार्क येथील ‘वक्रतुंड गणेश मंडळाचा’ गणपती विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. विसर्जन मिरवणुकीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या महाआरती कार्यक्रमाला परिसरातील महिला, नागरिक आणि गणेश भक्तांचा अथांग व भरभरून प्रतिसाद लाभला.

मान्यवरांच्या हस्ते महाआरती

या महाआरती प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन मा. भरतभाऊ गावीत (सपत्नीक), नवापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष मा. जयवंत जाधव (सपत्नीक), उपनगराध्यक्ष मा. नरेंद्र नगराळे (सपत्नीक), नगरसेविका सौ. मनीषा वसावे (सपत्नीक) यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन श्रींची महाआरती केली.



यावेळी नगरसेवक मनोहर गावीत, नगरसेवक नावेद शाहा, केंद्रप्रमुख भगवान सोनवणे, केंद्रप्रमुख सुनील नहिरे, श्री. दीपक भदाणे सर, श्री. राजू नेरकर सर (सपत्नीक), श्री. बाबा अहिरराव सर, श्री. भानुदास वसावे सर, श्री. विक्रम वळवी सर, श्री. अशोक पाडवी सर, श्री. प्रमेश वळवी सर, श्री. रमेश गावीत सर, श्री. बिरबल पाडवी सर, श्री. प्रमोद वसावे सर (सपत्नीक), श्री. मंगलसिंग गिरासे सर (सपत्नीक), श्री. सुनील वळवी सर (सपत्नीक) यांसह लाखाणी पार्कमधील अथांग गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा

वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने उपस्थितांच्या स्वागताचा व सत्काराचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये:

 * मा. भरतभाऊ गावीत (सपत्नीक) यांचे स्वागत डॉ. अनिल गावीत (सपत्नीक) यांनी केले.



 * नगराध्यक्ष जयवंत जाधव (सपत्नीक) यांचा सत्कार निवृत्त आयुक्त विजेसिंग वसावे (सपत्नीक) यांनी केला.

 * उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे (सपत्नीक) यांचे स्वागत प्रभाकर चव्हाण सर (सपत्नीक) यांनी केले.

 * नगरसेविका श्रीमती मनीषा मावची यांचे स्वागत श्री. विनोद पराडके (सपत्नीक) यांनी केले.

 * नगरसेवक आदरणीय मनोहर गावीत यांचा सत्कार विनोद पराडके सर यांनी केला.

 * नगरसेवक नावेद शाहा यांचा सत्कार सेवानिवृत्त शिक्षक अनिल वळवी सर यांनी केला.

 * डॉ. वसंत गावीत यांचा सत्कार शैलेश लुहार साहेब यांनी केला.

 * डॉ. भानुदास गावीत यांचा सत्कार श्री. योगेश महाले सर यांनी केला.

 * उद्योजक परवेज लाखाणी यांचा सत्कार श्री. विनोद पराडके यांनी केला.

 * शिक्षण विस्तार अधिकारी युनूस पठाण यांचा सत्कार श्री. प्रकाश गावीत यांनी केला.

 * केंद्रप्रमुख भगवान सोनवणे साहेब यांचे स्वागत श्री. प्रभाकर कुवर सर यांनी केले.

 * नवापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री. अभिजित अहिरे साहेब, श्री. भाऊसाहेब लांडगे साहेब व श्री. सागर गाडीलोहार साहेब यांचे स्वागत श्री. विनोद पराडके यांनी केले.

 * कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचेही गुलाबपुष्प देऊन आदराने स्वागत करण्यात आले.

नोकरदारांनी गणेशोत्सव साजरा करून दिला चांगला संदेश: भरतभाऊ गावीत

आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन मा. भरतभाऊ गावीत म्हणाले, "लाखाणी पार्क येथील सर्व नोकरदार बंधू-भगिनींनी आपल्या कामाची आणि नोकरीची जबाबदारी सांभाळून गणेशाची अतिशय सुंदर स्थापना केली आणि एक चांगला सामाजिक संदेश दिला आहे." त्यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण मंडळाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

शिस्तबद्ध आणि भक्तिमय विसर्जन मिरवणूक

महाआरती आणि सत्कार समारंभानंतर बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुण आणि बाल-गोपाळ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. 



हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश एस. गावीत यांच्या नेतृत्वाखाली श्री. विनोद पराडके सर, श्री. अनिल वळवी सर, श्री. योगेश महाले सर, श्री. अशोक राऊत सर, श्री. शैलेश लुहारे साहेब, श्री. डॉ. अनिल गावीत दादा, डॉ. धनराज पाटील सर, श्री. भाविन काथावला, श्री. रमेश गावीत सर, श्री. विजेसिंग वसावे साहेब, श्री. विजुभाई नायका, श्री. प्रभाकर चव्हाण सर, श्री. पंकज वसावे, श्री. संजय शिरसाठ नाना, श्री. रुपेश देसले सर, श्री. हेमंत पाटील सर, श्री. जयसिंग गावीत, श्री. डी. डी. गावीत सर, श्री. सुभाष कुवर सर आणि मंडळातील उपस्थित सर्व भगिनींनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments