नंदुरबार (प्रतिनिधी):
आगामी स्थानिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी (१० सप्टेंबर) नंदुरबार शहरातील शिंदे सेनेचे अल्पसंख्यांक शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक हारून रशीद हलवाई यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजितदादा पवार गट) अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे नंदुरबार शहरात शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रवेश
हा पक्षप्रवेश नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ना. श्री. हसनजी मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित दिलीपराव मोरे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश घडवून आणला गेला.
शहरातील राजकीय समीकरणांवर प्रभाव
हारून रशीद हलवाई हे नंदुरबार शहरातील अल्पसंख्यांक समाजात दांडगा जनसंपर्क आणि मानणारा मोठा वर्ग असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते विधान परिषदेचे आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या या प्रवेशामुळे नंदुरबार शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक पकड अधिक मजबूत होणार असून अल्पसंख्यांक समाजातील जनाधार वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निंबा माळी सर, तळोदा तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, सरचिटणीस मधुकर पाटील, कोषाध्यक्ष मॉन्टू जैन, तालुकाध्यक्ष योगेश पाटील, बबलू कदमबांडे, सुनील भाबड, मोहन ढोणे, प्रमोद महाजन, रिषी शर्मा, जावरे नाना यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हारून हलवाई यांच्या प्रवेशामुळे नंदुरबार शहरात आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.


Post a Comment
0 Comments