पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):
‘साक्षरता म्हणजे केवळ अक्षरओळख नसून बदलत्या काळासोबत ज्ञान, तंत्रज्ञान आणि डिजिटल कौशल्य आत्मसात करून सक्षम नागरिक घडविण्याची प्रक्रिया आहे. असा सक्षम आणि सुशिक्षित नागरिक हाच विकसित भारताचा भक्कम पाया आहे,’ असे प्रतिपादन श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांनी केले.
महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन तसेच या दिनाचा ६० वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कै. आ. मा. पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कुणाल गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रा. एन. एस. खैरनार यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
डिजिटल युगात साक्षरतेची नवी व्याख्या
प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांनी 'लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी साक्षरता' या जागतिक संकल्पनेवर मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, आधुनिक युगात साक्षरता ही केवळ सही करण्यापुरती मर्यादित नसून डिजिटल ज्ञान आणि माहितीचे आकलन ही तिची मुख्य ओळख बनली आहे. समाजातील निरक्षरता दूर करण्यासाठी प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रा. एन. एस. खैरनार यांनी साक्षरतेचे सामाजिक व राष्ट्रीय महत्त्व विशद केले.
घोषवाक्य स्पर्धा व विजेत्यांचा सन्मान
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींसाठी प्रबोधनात्मक घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना अध्यक्ष कुणाल गांगुर्डे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्नेहवस्त्र व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
* प्रथम क्रमांक: हर्षदा गावीत
* द्वितीय क्रमांक: रोहिणी भामरे
* तृतीय क्रमांक: पूनम बोरसे
विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमात रोहिणी भामरे, कावेरी चव्हाण, मेघा बोरसे, पूनम सोनवणे, ऐलिना ठिगळे आणि रफत शेख यांनी साक्षरतेच्या महत्त्वाबद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृप्ती ठाकरे यांनी केले, सूत्रसंचालन पूनम बोरसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हर्षदा गावीत यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थिनींच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


Post a Comment
0 Comments