पिंपळनेर येथे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा पार पडला. या दौऱ्यामुळे पिंपळनेर आणि परिसरातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल पाहायला मिळाली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
पिंपळनेर (विशेष बातमी): सहसंपादक अनिल बोराडे
महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक व निर्भीड नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या पिंपळनेर दौऱ्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महिलांच्या हक्कांच्या लढ्याला नवी उभारी देण्यासाठी आणि पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
महिला संघटन अन् राजकीय रणनीतीवर भर
कार्यक्रमादरम्यान चित्राताई वाघ यांनी महिला शक्तीच्या संघटनावर आणि आगामी राजकीय आव्हानांवर सविस्तर चर्चा केली. "महिलांच्या प्रश्नांवर केवळ घोषणा न देता मैदानात उतरून संघर्ष करण्याची गरज आहे," असा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला. पिंपळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. योगिताताई जितेश चौरे यांनी चित्राताई वाघ यांचे स्वागत केले. या भेटीमुळे स्थानिक पातळीवर भाजपा महिला मोर्चाची पकड अधिक घट्ट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या प्रसंगी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई अहिरराव, धुळे (ग्रा.) जिल्हाध्यक्षा धरतीताई देवरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रकलाताई सिसोदिया, नगरसेविका वंदनाताई भामरे, पिंपळनेर नगरपरिषदेचे सभापती डॉ. विनोद कोठावदे, हेमंत मराठे, सतीश शिरसाठ, डॉ. प्रशांत बागुल, प्रज्ञा बाविस्कर, नगरसेवक डॉ. दयानंद कोतकर, नगरसेविका मनीषा ढोले, लीलाबाई राऊत, आशा महाजन, माया पवार, धुळे (ग्रा.) जिल्हा उपाध्यक्षा सविताताई पगारे, तालुकाध्यक्षा ॲड. पूनम काकुस्ते (शिंदे), जिल्हा सरचिटणीस सुवर्णा आजगे आणि मंडलाध्यक्षा वैशाली बर्डे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, मोतीलाल पोद्दार, प्रमोद गांगुर्डे, विक्की कोकणी, चंद्रशेखर बाविस्कर, पंकज भावसार, डॉ. राजेंद्र पगारे, प्रतीक कोतकर, रवींद्र कोटकर, जगदीश धामणे, अविनाश पाटील, महेश पाटील, प्रकाश शिरसाठ, योगेश भदाणे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा दौरा म्हणजे केवळ सदिच्छा भेट नसून पिंपळनेरमधील भाजपा महिला शक्तीचे संघटन बळकट करणारा एक प्रभावी 'पॉवर शो' ठरल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.


Post a Comment
0 Comments