Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

चाळीसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 24 तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड, तिघांना अटक

सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे शहरातील शंभू फुले रोड परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत यशस्वी उकल केली आहे. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण 54 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून 2026 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला अडवून त्याच्याकडील मोबाईल फोन, रोख रक्कम हिसकावण्यात आली. तसेच मोबाईलमधील ओटीपीचा गैरवापर करून ऑनलाइन रक्कमही ट्रान्सफर करण्यात आली. याप्रकरणी 2 जुलै 2026 रोजी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून इतर साथीदारांची माहिती समोर आली. त्यानुसार चिरंतन उर्फ दादू गवळी, हर्षल राजेंद्र मेढे आणि दत्तात्रय उर्फ लक्ष्या दिनेश पाटील यांचा सहभाग निष्पन्न झाला. यापैकी हर्षल मेढे याला अटक करण्यात आली असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. 


या कारवाईत पोलिसांनी फिर्यादीचा मोबाईल, रोख रक्कम, ऑनलाइन हस्तांतरित रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण 54,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रज्ञेश उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. विवेक पवार व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोउनि. संतोष काळे, पोलीस अंमलदार अजय जाधव, संदीप चौधरी, समाकांत पवार, सचिन पाटील, इझीजन बेरोट, शौषव बगे, अतिक शेख आणि सिराज घाटोळे यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments