*सहसंपादक अनिल बोराडे*
धुळे शहरातील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी करून पळून जाणाऱ्या 19 वर्षीय आरोपीला धुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत पाठलाग करून रंगेहात अटक केली. आरोपी समीर शहर सज्जन शाह (रा. इब्राहिम गार्डन रोड, इकबाल मिठाईजवळ, धुळे) याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे ₹15 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
डायल 112 वर मिळालेल्या माहितीच्या आधारे बिट मार्शल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. नागरिक श्री. सचिन वाडीले यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे आरोपीचा माग काढून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजितकुमार आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. नितीन चौधरी, पोलीस अंमलदार रवीकिरण राठोड, दुर्गेश पाटील, महेश मोरे, राहुल सरदार, सचिन जेंगुळे, रोहिणी पवार, अमोल पगारे, तुषार पारधी, प्रशांत नावगिरे, अमित समळके, घनश्याम वाघ, योगेश वानखेडे व शाहीद शेख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Post a Comment
0 Comments