सहसंपादक अनिल बोराडे
शहादा शहरात पत्रकारितेच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला. जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांच्या एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा हुंकार आज शहाद्यात उमटला. जिल्हा व तालुका स्तरावरील पत्रकारांना एकाच छताखाली आणत "इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटना" या नव्या आणि सामर्थ्यशाली संघटनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. या ऐतिहासिक बैठकीला शहादा शहर व परिसरातील नामवंत पत्रकारांनी विक्रमी उपस्थिती दर्शवत आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले.
निर्भीड पत्रकारितेचा नवा संकल्प
बैठकीच्या प्रारंभीच उपस्थित पत्रकारांनी आपला परिचय देत संघटित होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. चर्चेअंती संघटनेच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. केवळ संघटना बांधणे हा उद्देश नसून, पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करणे, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे आणि समाजाभिमुख, निर्भीड पत्रकारितेला बळ देणे हे संघटनेचे मुख्य ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नूतन कार्यकारिणीची घोषणा
या ऐतिहासिक सभेत जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने आणि घोषणाबाजीने दणाणून गेले होते.
जिल्हा कार्यकारिणी:
* जिल्हाध्यक्ष: ऋषभ अग्रवाल
* जिल्हा उपाध्यक्ष: जगन ठाकरे
* जिल्हा सचिव: कृष्णा कोळी
शहादा तालुका कार्यकारिणी:
* तालुकाध्यक्ष: कैलास सोनवणे
* तालुका उपाध्यक्ष: दिलीप महिरे
* तालुका सचिव: संजय मोहिते
* सहसचिव: विश्राम मावची
* ग्रामीण तालुका अध्यक्ष: राजेंद्र बिरारी
* तालुका सल्लागार: आनंद बच्चाव
शहादा तालुका सदस्य:
किशोर पाटील, डॉ. भूपेंद्र पाकळे, अबरार अन्सारी, साजिद शेख, रविंद्र रामराजे, शाहिद शहा, योगेश पाटील, दगडू निकम, आबा निकम, प्रभू नाईक, सलमान तेली, रुपेश राजपूत यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार
या संघटनेच्या माध्यमातून आता इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना एक प्रभावी आणि लढाऊ व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भविष्यात पत्रकारांवर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही, प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार वर्गात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संजय मोहिते यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. भूपेंद्र पाकळे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments