Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेर महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

 सहसंपादक अनिल बोराडे 

देशसेवेसाठी महापुरुषांचे विचार आत्मसात करा: डॉ. विवेकानंद शिंदे यांचे आवाहन


"गृहस्थाश्रमाच्या चार भिंतीत अडकून राहण्यापेक्षा गुरूंची आज्ञा पाळून संन्यासाश्रम स्वीकारत नरेंद्रदत्त यांनी भारतभ्रमण केले. शिकागो येथील धर्म परिषदेत जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली आणि नरेंद्रदत्तचे 'स्वामी विवेकानंद' झाले," असे प्रतिपादन प्राचार्य ए. बी. मुसळे यांनी केले.

पिंपळनेर येथील कर्मवीर आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती (युवा दिन) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.



महापुरुषांचे चरित्र मार्गदर्शक

कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. विवेकानंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महापुरुषांची चरित्रे वाचली पाहिजेत. त्यांच्या बालपणातील संस्कारांतून प्रेरणा घेऊन एक उत्तम नागरिक बनावे आणि देशाच्या सेवेसाठी सज्ज व्हावे."

संस्कारांची शिदोरी: प्राचार्य डॉ. लहू पवार

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू पवार यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, "जिजाऊंनी शिवरायांवर केलेले संस्कारच स्वराज्य निर्मितीसाठी संजीवनी ठरले. त्यांचे हे संस्कार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत."

कार्यक्रमाची रूपरेषा

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. विद्यार्थिनी सलोनी गांगुर्डे हिने स्वागत गीत सादर केले.

उपस्थित मान्यवर:

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आदित्यराज पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एल. जे. गवळी, आयक्यूएसी (IQAC) संयोजक डॉ. संजय खोडके, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय तोरवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय खोडके यांनी केले, तर आभार प्रा. एल. जे. गवळी यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments