सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर येथे शिकणाऱ्या कु. दिपाली पांडुरंग पवार हिने धुळे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. दिपालीने धुळे जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत नाशिक विभागीय स्पर्धेसाठी यशस्वी निवड निश्चित केली आहे.
आज, दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत दिपालीने 17 वर्षांखालील मुलींच्या गटात आपला उत्कृष्ट खेळ दाखवला. तिच्या या यशाने केवळ विद्यालयाचेच नव्हे, तर पिंपळनेर तालुक्याचेही नाव उज्ज्वल केले आहे.
मार्गदर्शक व अभिनंदन
दिपालीच्या या दैदिप्यमान कामगिरीसाठी तिला जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री. हेमंत भदाणे सर, श्री. प्रमोद पाटील सर (धुळे), क्रीडा शिक्षक श्री. महेश मराठे सर, प्रा. जी. ए. गांगुर्डे सर, आणि श्री. सागर मोहिते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दिपालीच्या या यशाबद्दल तिचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. एम. के. पाटील, श्री. स्वप्निल बोंडे सर, श्रीमती रेखा पाटील मॅडम, श्री. मदन गावित सर (धुळे) यांनी अभिनंदन केले.
याशिवाय, कै. आ. मा. पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी, पिंपळनेरचे संस्थापक अध्यक्ष श्री. दादासाहेब सुरेंद्रराव विनायकराव मराठे, संचालक श्री. कृणाल गांगुर्डे, श्री. यजुर्वेद मराठे, श्री. जयेश मराठे, प्राचार्या श्रीमती एस. एस. पवार मॅडम, पर्यवेक्षक श्री. डी. पी. कुवर सर, जेष्ठ शिक्षक श्री. जे. एन. मराठे सर, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षक बंधु-भगिनींनी दिपालीचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिला नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.
दिपाली पवार हिच्याकडून नाशिक विभागीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments